नाशिक

गोवर्धन पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद खासदार राजाभाऊ वाजे यांचे भगूर शाखा शुभारंभप्रसंगी प्रतिपादन

CD
22651 भगूर : गोवर्धन पतसंस्थेच्या भगूर शाखेचे उद्‌घाटन करताना खासदार राजाभाऊ वाजे. शेजारी प्रेरणा बलकवडे, नारायण वाजे, शरद रत्नाकर, भाऊसाहेब पवार, पांडुरंग पवार आदी. गोवर्धन पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : खासदार वाजे सकाळ वृतसेवा सिन्नर, ता. ९ : तालुक्यातील सोनांबे येथे स्थापन झालेल्या गोवर्धन पतसंस्थेने व्यवसायवृद्धी करत नाशिक शहरालगत भगूर या ठिकाणी तिसरी शाखा सुरू केली आहे. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सोनांबे येथे शाखेचे उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर भगूरच्या नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे सहकार्याध्यक्ष नारायण वाजे, उपनगराध्यक्ष प्रकाश आडके, नगरसेवक विशाल बलकवडे, दीपक बलकवडे, उदय सांगळे, सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष संग्राम कातकाडे, सहायक निबंधक संजय गिते, डाँ. राजेंद्र गोऱ्हे, संस्थेचे अध्यक्ष शरद रत्नाकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब पवार, डॉ. रवींद्र पवार, केरू पवार, तानाजी पवार, दिनेश रत्नाकर, पांडुरंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेकडे एकूण ५५ कोटी रुपयांच्या ठेवी असून ४२ कोटी रुपये कर्ज वाटप केलेले आहे. सोनांबे आणि सिन्नर शाखा स्वमालकीच्या इमारतीत असून संस्थेला सातत्याने ऑडिट वर्ग अ प्राप्त आहे. संस्थेचा स्वनिधी ५ कोटींपेक्षा अधिक असून १५ कोटींची गुंतवणूक असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद रत्नाकर यांनी दिली. संचालक संतोष डावरे व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोडे यांनी सूत्रसंचालन तर पांडुरंग पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : बालासोरच्या जंगलातून सुखरूप वाचवण्यात आलेल्या पाच ओरंगुटानच्या पिल्लांना भुवनेश्वरमधील नंदनकानन प्राणीसंग्रहालयात

SCROLL FOR NEXT