नाशिक

सिन्नरमधील कृषी उपक्रमांची सचिवांकडून पाहणी

CD
SNR26B22669 सिन्नर ः ब्राम्हणवाडे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्य कृषी सचिव परिमल सिंह. ---------------- सिन्नर तालुक्यातील कृषी उपक्रमांची पाहणी ------------ कृषी सचिवांकडून प्रात्यक्षिक, शेती गट, यांत्रिकीकरणाचा आढावा ---------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १० ः तालुक्यातील कृषी उपक्रम, प्रात्यक्षिक, शेती गट, यांत्रिकीकरण व शेडनेटगृहांना राज्यकृषी सचिव परिमल सिंह यांनी भेट देवून पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. दौऱ्यात कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, शेतकऱ्यांचा सहभाग, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर यांचा आढावा घेण्यात आला. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक रवींद्र माने, प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय कृषी अधिकारी भटू पाटील, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, तंत्र अधिकारी गायकवाड, उपकृषी अधिकारी रणजित आंधळे, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार, योगिता घोरपडे, वनिता शिंदे, तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव आदी उपस्थित होते. जोगलटेंभी येथे परदेशी भाजीपाला लागवडीची पाहणी करण्यात आली. उज्वला जेजुरकर यांच्या परदेशी भाजीपाला लागवड क्षेत्राची माहिती घेतली. परदेशी भाजीपाल्याचे विविध प्रकार, त्यांचा आहारातील वापर तसेच उपलब्ध बाजारपेठ याबाबत चर्चा करण्यात आली. ब्राह्मणवाडे येथील कमलाकर रामराजे यांच्या हरसुले येथे प्रकाश शिंदे यांच्या सोयाबीन क्षेत्राची पाहणी केली. एकवीस दिवसांचा पावसाचा खंड पडलेला असतानाही सोयाबीन पिकाची सद्यस्थिती सर्वसाधारणपणे चांगली असल्याचे निदर्शनास आले. हरसुले येथे सखूबाई आनंदा शिंदे यांच्या शेतावरील शेडनेटगृहाची पाहणी करण्यात आली. शिमला मिरची उत्पादनाची माहिती परिमल सिंह यांनी घेतली. १६-१ योजनांचा घेतला आढावा कृषी विभागाच्या विविध योजना व आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांकडून होत असलेला वापर, शेतकरी गटांचा सहभाग आणि कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना मिळणारा प्रत्यक्ष लाभ यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून अडचणी, अनुभव आणि अपेक्षा जाणून घेतल्या. -----------

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT