नाशिक

गणेशोत्सव शांततेत साजरा करावा

CD
SNR26B22671 नांदूरशिंगोटे ः गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भास्कर शिंदे. समवेत शांतता समितीचे पदाधिकारी. ---------------- ३६-३ गणेशोत्सव शांततेत पार पाडावा ------------- भास्कर शिंदे ः नांदूरशिंगोटे येथे शांतता समितीची बैठक ------------- सकाळ वृत्तसेवा नांदूरशिंगोटे, ता.१० ः गणेशोत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडावा, असे आवाहन वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केले. नांदूरशिंगोटे येथे गणेशोत्सव मंडळाचे पदादिकारी, शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. उपनिरीक्षक सी. एम. चव्हाण, शहाजी शिंदे यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, कामगार पोलिस पाटील, ज्येष्ठ नागरिक व गणेशभक्त उपस्थित होते. श्री. शिंदे यांनी प्रत्येक गणेश मंडळाने अधिकृत परवानगी घ्यावी, गणेशमूर्ती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना, डिजेमुक्त मिरवणुका, पारंपरिक वाद्यांचा वापर, ध्वनिप्रदूषण टाळणे आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक व कायदा- सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीत वादविवाद होणार नाही, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकारींनी काळजी घेण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव व्हावा, यासाठी मंडळांनी आकर्षक आरास, देखावे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केले. ------

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT