पान-२ मेन
फोटो- 08683
निफाड ः येथील पोलिस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना अप्पर पोलिस अधीक्षक विमला एम.
गणेशोत्सवात नियमांचे पालन करावे
अप्पर पोलिस अधीक्षक विमला एम. ः निफाडला शांतता समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता. १३ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड पोलिस ठाणेतर्फे देवकृपा बँक्वेट हॉल येथे शांतता समितीची बैठक झाली. अप्पर पोलिस अधीक्षक विमला एम. यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
.........
निफाडचे पोलिस उपअधीक्षक कांतिलाल पाटील, पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, वाल्मीक कापसे, नायब तहसीलदार राहुल मुळीक, नगरसेवक मुकुंदराजे होळकर, संदीप जेऊघाले, शारदा कापसे, साहेबराव बर्डे, मयुरी नवले, सोनल फडोळ, नंदकुमार कापसे आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अहिरराव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नूरभाई शेख, लक्ष्मण आहेर, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, पोलिस उपअधीक्षक कांतिलाल पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. चित्रकला स्पर्धेचे तसेच उत्कृष्ट गणेश मंडळांना या वेळी गौरविण्यातआले.
अप्पर पोलिस अधीक्षक विमला एम. यांनी गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट केले. मंडप उभारणी, मिरवणुका, ध्वनिक्षेपकांचा वापर, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था याबाबत मंडळांनी काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोखा अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. उत्सवादरम्यान शासनाचे नियम अथवा सूचनांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक विमला एम. यांनी दिला.
गणेशोत्सव सामाजिक एकोप्याचा उत्सव असून, तो शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नागरिक, गणेश मंडळे आणि पोलिसांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून, आदर्श पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. अभिजित डुकरे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद ढवळे यांनी आभार मानले.
.......................................................
फोटो- 22682
सिन्नर ः शांतता समितीच्या बैठकीत बोलताना कांतिलाल पाटील. शेजारी दीपा जेधे, विठ्ठल उगले, उदय सांगळे, हर्षद देशमुख, अमोल देशमुख, श्रीराम पवार, सुनील बडगुजर आदी.
गणेशोत्सव शांततेत
साजरा करा ः कांतिलाल पाटील
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर ः गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करून डीजे न वाजवता गणेशोत्सव साजरा करावा. डीजे वाजवल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार आवाजाची मर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस उपअधीक्षक कांतिलाल पाटील यांनी दिला. सिन्नर, एमआयडीसी व वावी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांतील मंडळे, नागरिक, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रांताधिकारी दीपा जेधे, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, भाजपचे नेते उदय सांगळे, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते अमोल देशमुख, पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सुनील बडगुजर, वावीचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे, नायब तहसीलदार सागर मुंदडा, माणिक गाडे, महावितरणचे हेमंत बनसोड, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. निर्मला पवार आदी उपस्थित होते.
पोलिस कर्मचाऱ्यांना डीजेचा आवाज मोजण्याचे प्रशिक्षण नुकतेच दिले असून, डीजेचा आवाज मर्यादितच ठेवावा लागणार आहे. रात्री दहापर्यंतच ध्वनिवर्धक लावण्याची परवानगी आहे. पाचव्या, सातव्या व दहाव्या दिवशी रात्री बारापर्यंत परवानगी आहे. मिरवणुकांत गुलाल न वापरता फुलांची उधळण करावी, असे आवाहन त्यांनी केले. मंडळांची नोंदणी, सुरक्षा व्यवस्था यावर मार्गदर्शन केले.
भाजपचे उदय सांगळे यांनी रस्त्यांच्या कामांचे नियोजन पालिकेने करावे, ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करावी, असे सांगितले. नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी कृत्रिम तलाव, पथदीप, रस्त्यांतील खड्डे बुजविणे याचे नियोजन केल्याची माहिती दिली.
दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, डॉ. विष्णू अत्रे, भाग्यश्री ओझा, शरद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
गेल्या वर्षी मिरवणूक, गणेशोत्सवातील उपक्रमाबाबत मंडळांना गौरविण्यात आले.
..........................................................................................................
फोटो- 12940
वणी - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र फड.
शांतता समितीची
वणीत बैठक
वणी ः गणेशोत्सव उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सण असून, तो साजरा करताना कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, तसेच कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने दक्षता घ्यावी. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र फड यांनी केले.
वणी पोलिस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळे, शांतता समितीचे सदस्य व पोलिसपाटील यांची संयुक्त बैठकीत ते बोलत होते. फड यांनी शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनिमर्यादेचे पालन करावे, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, वर्गणी गोळा करताना दुकानदार, व्यावसायिक किंवा नागरिकावर दबाव आणू नये. मंडप उभारणीसाठी संबंधित विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी, अशा सूचना केल्या. रोषणाई करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून महावितरणची परवानगी घ्यावी. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, तसेच डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची मंडळांनी काळजी घ्यावी. मंडळांचा व पोलिसांचा समन्वय राहिल्यास गणेशोत्सव अधिक आनंददायी व शांततेत पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य रविकुमार सोनवणे यांनीही काही सूचना केल्या. या वेळी शांतता समितीचे सदस्य, पोलिसपाटील व गणशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
..............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.