दूध पावडर प्रकरणातील संशयितांवर
कारवाईची पोलिस आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १२ ः तालुक्यातील दूध संकलन केंद्रे, दूध वाहतूक, दूधप्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत व्यापक चौकशी होणे गरजेचे आहे. रामपूर येथे १७ लाखांची दूध पावडर जप्त करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
दूध पावडर उत्पादन, विक्री, साठवणूक किंवा वितरणासाठी आवश्यक वैध परवाने, अन्न व्यवसाय परवाना, एफएसएसएआय नोंदणी, साठवणूक परवाना, खरेदी-विक्रीचे बिल व वाहतूक कागदपत्रे याची चौकशी करण्यात यावी. पावडरचा वापर प्रत्यक्ष दूध भेसळीसाठी झाला असल्यास कोणकोणत्या दूध संकलन केंद्रांना, खासगी दूध विक्रेत्यांना, दूध वाहतूकदारांना, हॉटेल, मिठाई उत्पादकांना अथवा इतर संबंधित व्यक्तींना तिचा पुरवठा करण्यात आल्याचा संशय आहे. या साखळीची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही बैरागी यांनी केली आहे.
जप्त पावडरचा स्रोत, उत्पादन कंपनी, पुरवठादार, खरेदी-विक्रीची बिले, वाहतूकदार, बँक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स, डिजिटल व्यवहार, गुदाम नोंदी आणि मालाच्या वितरणाची संपूर्ण साखळी तपासावी. या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन योग्य ती तातडीची कारवाई करावी, अशी मागणी बैरागी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.