नाशिक

हिवरगावच्या टोमँटो मार्केटचा विस्तार पंधरा एकर जागेवर होणार सुविधाची उभारणी

CD
फोटो-22698 हिवरगाव ः टोमॅटो उपबाजार विकास आराखड्याची पाहणी करताना खासदार राजाभाऊ वाजे. शेजारी शरद थोरात, विजय विखे आदी. हिवरगावच्या टोमॅटो बाजाराचा विस्तार पंधरा एकर जागेवर होणार सुविधांची उभारणी सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १३ ः सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगाव येथील टोमॅटो बाजाराचा विस्तार होणार असून, त्यासाठी समितीने १५ एकर जागा खरेदी केली आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. सभापती शरद थोरात, उपसभापती सिंधू कोकाटे, सचिव विजय विखे व संचालक मंडळाच्या प्रयत्नातून समितीने नुकतीच हिवरगाव शिवारात ही जागा खरेदी केली. खासदार वाजे यांनी या जागेची पाहणी करून भविष्यात सुविधांची निर्मिती करण्याबाबत प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळण्यासाठी आराखड्याबाबत आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या. या वेळी सभापती थोरात, सचिव विजय विखे आदी उपस्थित होते. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची वाढती संख्या आणि बाजारपेठेची भविष्यातील गरज लक्षात घेऊन मालाची हाताळणी, लिलाव व्यवस्था, वाहने पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभ, वाया जाणाऱ्या टोमॅटोला टाकण्यासाठी सुविधा, कार्यालय आदी सुविधांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे बाजार समितीचे रूपडे पालटणार आहे. एक लाखावर आवक रोज एक ते सव्वा लाख कॅरेटपर्यंत टोमॅटोची आवक होत असते. सिन्नरसह निफाड, कोपरगाव येथील शेतकऱ्यांनाही या उपबाजाराचा लाभ मिळतो. त्यामुळे हिवरगाव येथील उपबाजार नावारूपाला आहे. त्याचा विस्तार होणार असल्याने शेतकऱ्यांकडूनही स्वागत होत आहे. .............. चौकट वाहतूक कोंडीतून होणार सुटका हिवरगाव येथील टोमॅटो उपबाजार ओझर ते शिर्डी विमानतळांना जोडणाऱ्या राज्यमार्गावर आहे. त्यामुळे उपबजाराजवळ रोज वाहतूक कोंडी होते. या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे हाल होतात. उपबाजारात सुविधांची उभारणी होताच वाहनतळामुळे वाहन कोंडीतूनही सुटका होणार आहे. ..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT