SNR26B22702
सिन्नर ः श्रींच्या मूर्तीस वाजतगाजत घरी नेताना भाविक.
------------
सिन्नरमध्ये ४१ गावांत एक गाव एक गणपती
-------------
शहरासह ग्रामस्थांचा जोरदार पाठिंबा ः ढोल-ताशांच्या कडकडाटात गणरायाचे स्वागत
-------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १४ ः शहर व तालुक्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध सार्वजनिक मंडळांसह कार्यालये, संस्था, मंदिरे व घरगुती गणपतींची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. ‘मोरया... मोरया... चा जयघोष करत वाजतगाजत मिरवणुका काढण्यात आल्या. मंत्रोच्चार व पूजाविधी करुन स्थापना करण्यात आली. दरम्यान तालुक्यात ४१ गावांत एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
---------------
गणेश मूर्तीसह देखाव्याच्या वस्तू खरेदीसाठी येथील चौदा चौक वाडा, भैरवनाथ मंदिर परिसर, गंगावेस, सरदवाडी मार्ग भागात भाविकांनी गर्दी केली होती. २०१ रुपयांपासून ते ४१ हजार रुपयांपर्यंतच्या गणेशमूर्ती उपलब्ध होत्या. गणेशमूर्तीचे वाजत-गाजत आगमन केले जात होते. गणपती बाप्पा मोरया च्या घोषणेने शहर व उपनगरांसह गावे दुमदुमून गेली होती.
फुले, हार, रंगीबेरंगी माळा, पताका, प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. इलेक्ट्राँनिक दुकानांतही रंगीबेरंगी वीज माळा, इलेक्ट्रीक साहित्य, शोभेच्या इलेक्ट्रीक वस्तू खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मूर्तींच्या किमतीत ३० टक्के वाढ झालेली असली तरी भाविकांचा उत्साह कायम होता. रोषणाईचा झगमगाट व चौका चौकात मंडळांनी श्रींची स्थापना केली होती. मंत्रोच्चार व धार्मिक पूजाविधी करून ही स्थापना करण्यात आली.
१६-१
४१ गावांत एक गाव एक गणपती
तालुक्यातील ४१ गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला आहे. वावी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सर्वाधिक २२ गावांत हा उपक्रम राबविण्यात आला. सिन्नर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १८ तर वावी पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एका गावात एक गावाने एक गणपतीसाठी प्रतिसाद दिला.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.