नाशिक

सिन्नर नगरपरिषदेची गणेशोत्सव स्पर्धा

CD
३०-२ पर्यावरणपूरक गणेशोत्सवची सिन्नर नगरपरिषदेतर्फे स्पर्धा सिन्नर, ता.१४ ः ''स्वच्छ सर्वेक्षण २०२६'' व ''माझी वसुंधरा अभियान ७.०'' अंतर्गत सिन्नर नगरपरिषदेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येणार आहे. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होत आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मुख्याधिकारी अभिजित कदम, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, आरोग्य सभापती ललिता हांडे, गटनेते सागर भाटजिरे, मनोज देशमुख, अनिल सरवार, शोभा जाधव यांनी केले आहे. जल व थल प्रदूषण रोखणे, प्लास्टिक व प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळून शाडूच्या मातीची मूर्ती व नैसर्गिक सजावटीला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. सिन्नर शहरातील नागरिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होऊन ''स्वच्छ, हरित, सुंदर व निरोगी'' बनवण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. स्पर्धा घरगुती व सार्वजनिक मंडळ अशा दोन गटात घेतली जाणार आहे. घरगुती गटात एक ते दहा हजार रुपये, शाडू माती मूर्तीसाठी ५० घरगुती गणेशांना प्रत्येकी ५०० रुपये व सहभाग नोंद प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळांसाठी प्रथम क्रमांकास २१ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय ११ हजार, चतुर्थ सात हजार तर उत्तेजनार्थ पाच हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. नागरिकांनी शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव (९८२२४०३७०७), स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे (९४२३२४२४४२), यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT