नाशिक

स्टाईसतर्फे ज्येष्ठ उद्योजकांचा गौरव १९८२ च्या आठवणींना दिला उजाळा

CD
पान दोन ॲंकर --------------------- 22709 सिन्नर : स्टाईसमध्ये वार्षिक बैठकीत सन्मानार्थी उद्योजकांसह अरुण चव्हाणके, प्रमोद महाजन व संचालक मंडळ. स्टाईसतर्फे ३८ ज्येष्ठ उद्योजकांचा गौरव १९८२ च्या आठवणींना मिळाला उजाळा सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १५ : तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या(स्टाईस) ४४ व्या अधिमंडळ वार्षिक सभेत ३८ ज्येष्ठ उद्योजकांचा गौरव करण्यात आला. यावेळी १९८२ च्या आठवणींना उजाळा देत उद्योग स्थापन करताना आलेल्या अडचणीं, अनुभवांना उजाळा देण्यात आला. संस्थेच्या कार्यालयातील नंदलाल केला सभागृहात वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष अरुण चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी संचालक, उद्योजक, सभासद उपस्थित होते. बारामती येथे विमान अपघातात निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गत आर्थिक वर्षात निधन झालेल्या सहकार, कला, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष अरुण चव्हाणके यांनी वसाहतीचे शिल्पकार नानासाहेब गडाख, किसनराव चव्हाणके, प्रकाशशेठ शहा या संस्थापक त्रिमुर्तींना अभिवादन करुन विविध विकास कामांची माहिती दिली. पूर्ण झालेली विकासकामे, भविष्यात हाती घेण्यात येणारी प्रस्तावित विकासकामे याविषयी माहिती दिली. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्फत सुरू असलेल्या विविध माहिती दिली. या कामांचे सभासदांनी स्वागत केले. संस्थेच्या विविध कामांबाबत सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. मनोगत व्यक्त करताना परस्पर सहकार्याची भावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. सभासदांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे, एकजुटीने घेतलेल्या निर्णयामुळे खेळीमेळीच्या, उत्साही वातावरणात बैठक पार पडली. --------- आठवणींना दिला उजाळा संस्थेच्या वाटचालीत योगदान दिलेल्या ३८ ज्येष्ठ उद्योजक सभासदांचा गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल ज्येष्ठ उद्योजकांनी संस्था व संचालक मंडळाचे आभार मानले. १९८२ ला उद्योग सुरू करताना आलेल्या आठवणींना उजाळा देत त्या काळात मिळालेली मदत व सहकार्य याबद्दल त्यांनी आठवणी सांगितल्या. उपाध्यक्ष प्रमोद महाजन यांनी आभार मानले. मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT