नाशिक

नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मोहीम

CD
22725 सिन्नर : स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले नगरसेवक पदाधिकारी, कर्मचारी. सिन्नरला नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मोहीम सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १६ : ‘स्वच्छ सिन्नर, माझे सिन्नर’ हा संकल्पानुसार नगर परिषदेने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. जोशीवाडी परिसरातील ठिकाणे स्वच्छ करुन मोहिम सुरु करण्यात आली. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मुख्याधिकारी अभिजीत कदम, आरोग्य सभापती ललिता हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांनी विविध भागांमध्ये प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छता केली. वैदुवाडी, जोशीवाडी, माकरवाडी, पंचायत समिती परिसर, नगरपरिषद परिसरातील रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. परिसरातील कचरा, पालापाचोळा व इतर घाण हटवून स्वच्छ परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक पंकज जाधव, नगरसेविका अंबिका लोकेश जांगर, नगरसेविका सविता सुनील खोळंबे, स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे, ताहिर शेख, अतिक्रमण विरोधी अधिकारी अजय शेदवळ, अमित रायते आदींनी सहभाग घेतला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत नागरिकांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण करून लावलेल्या झाडांची नियमित देखभाल करावी, असे आवाहन करण्यात आले. ------------ सिन्नर शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही फक्त नगरपरिषदेची नव्हे तर प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. प्रत्येकाने कचरा रस्त्यावर न टाकता नगरपरिषदेच्या स्वच्छता उपक्रमाला सहकार्य करावे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवावीत. विठ्ठल उगले, नगराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT