नाशिक

अतिक्रमण धारकांना नगर परिषदेकडून समज वाहतुकीला अडथळा झाल्यास कारवाईचा इशारा

CD
22727 सिन्नर : नाशिक वेस भागात रस्त्यात दुकान थाटणाऱ्या विक्रेत्यांना समज देवून मागे हटवताना नगरपरिषद कर्मचारी. सिन्नर शहरात दुकानांवर कारवाई सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १६ : गणेशोत्सवाचा आनंद नागरिकांना घेता यावा, शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहावेत यासाठी रस्त्यात दुकान थाटून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नगर परिषदेकडून समज देण्यात आली. तसेच काही दुकाने मागे घेण्याची सूचना करण्याबरोबरच अडथळा ठरणारे दुकाने हटविण्यात आली. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मुख्याधिकारी अभिजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मुलन विभागाने ही कारवाई केली. कारवाईत नाशिक वेस परिसरातील भाजी बाजार, जूना बैल बाजार रस्ता गंगावेस परिसरातील अतिक्रमण, हातगाड्या तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य बाजूला करण्यात आले. नाशिक वेस ते गंगा वेस, प्रताप टाँकीज मार्ग, बाजार वेस परिसरात विक्रेत्यांनी दुकानेथाटून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अडथळे केले होते. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह गणेशभक्तांना ये-जा करताना अडचण होत होती. त्यामुळे नगर परिषदेने कारवाई केली. याबरोबरच शहरातील भैरवनाथ मंदिर परिसर, नेहरू चौक आदी ठिकाणीही अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळणे, भाविकांची सुरक्षितता आणि नागरिकांना शहरातील गणेशोत्सवाचा आनंद मुक्तपणे घेता यावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अजित शेदवळ, अमित रायते यांच्या उपस्थितीत पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT