नाशिक

रिडींग न घेताच विज देयके हातात ग्राहकांत संताप, उशीराच्या देयकांमुळे भुर्दंड

CD
पान-१ ॲंकर SNR26B22730 विजयनगरात रिडींग न घेताच दिलेली देयके. ३६-३ सिन्नरमध्ये रीडिंग न घेताच वीज देयके ----------- ग्राहकांत संताप, उशिराच्या देयकांमुळे जादा भुर्दंड, गत महिन्यातही असाच प्रकार --------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१७ ः शहरातील विजयनगर भागातील वीज ग्राहकांना मीटरचे रीडिंग न घेताच वीज देयके मिळाली आहेत. अंदाजे देयकांमुळे ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय उशिरा देयके वितरित करण्यात येत असल्याने त्याचाही भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. चालू महिन्याच्या रिडिंगच्या रकान्यात ‘ उपलब्ध नाही’ असा शेरा मारण्यात आला आहे. ------------ जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य दत्ता शेळके यांनाच या अंदाजे वीज देयकाचा सामना करावा लागला आहे. विजयनगर परिसरातील अनेक वीज ग्राहकांना अशाच प्रकारे रीडिंग न घेताच अंदाजे देयके देण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणच्या या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत शेळके यांनी महावितरणचे ग्रामीण कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोड यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. रीडिंग न घेता अंदाजे देयके वितरित करणे ही प्रशासनाची चूक असून याबाबत ठेकेदारास पाठवून मीटर रीडिंग घेण्यात यावेत, त्यानंतर सुधारित देयके वितरित करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. अंदाजे देयके मान्य नसल्याची तक्रार केली आहे. १६-१ ग्राहकांचा वारंवार अनुभव विजयनगरातील नागरिकांना अनेकदा रीडिंग न घेता देयके दिली जाण्याच्या घटना या अगोदरही घडल्या आहेत. शिवाय वितरणाची मुदत संपल्यानंतर त्याचे वितरण झाल्याबाबत गत महिन्यातही तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्याची पुनरावृत्ती झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. १६-१ उशिराच्या देयकांचा भुर्दंड संबंधित ठेकेदार सातत्याने सवलतीच्या दिनाकांच्या तारखेनंतर उशिरा देयके वितरित करत आहेत. उशिराचा दंड विनाकारण ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. चुकीची बिले ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावी अशीही मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे. १६-१ चौकट तर आयोगाकडे न्याय मागणार वितरित केलेली बिले वीज ग्राहकास मान्य नाहीत. त्यात सुधारणा करावी. अन्यथा वीज ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सार्वजनिक दाद मागून न्याय मिळवावा लागेल असे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य दत्ता शेळके यांनी म्हटले आहे. ----------- कोट मीटर रिडिंगसाठी असलेल्या एजन्सीला नोटीस बजावली आहे. पुढील महिन्यात संबंधित बिलांबाबत रीतसर देयके येतील. - मनोहर पाटील, सहाय्यक अभियंता, महावितरण. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT