नाशिक

गणेशोत्सवात नगर परिषदेकडून आग प्रतिबंधक जनजागृती

CD
SNR26B22756 सिन्नर ः सिध्देश्वरनगरात गॅस सिलिंडरला लागलेली आग विझविण्याचे प्रात्यक्षिक सादर करताना अग्निशमन दलाचे कर्मचारी. ------------------ ३०-२ सिन्नरला गणेशोत्सवानिमित्त आग प्रतिबंधक जनजागृती ----------- नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून उपक्रम ----------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१९ ः नगरपरिषदेतर्फे सिध्देश्वरनगरात गणेशोत्सवात नागरिकांची आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या संकल्पनेतून अग्निसुरक्षा उपक्रम शहरात हाती घेण्यात आला आहे. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. अग्निशमन दलातील आकाश देवकर, सागर डावरे, सौरभ भागवत, वैभव केदार, अक्षय लोणारे यांनी प्रात्यक्षिक सादर केले. साक्षी खालकर, भाग्यश्री ठाकरे, सुरेखा कुऱ्हाडे, रंजना खालकर, स्वाती अनवट, वृषाली गिते या महिलांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेत गॅस सिलिंडरला आग लागल्यानंतर ती विझवून दाखवली. शहर व उपनगरात ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या गणेशत्सवात आरती करतेवेळी नागरिकांची गर्दी होते. नागरिकांना अग्निसुरक्षा उपक्रमातून आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. नगराध्यक्ष उगलेंच्या सुचनेनुसार प्रात्यक्षिकात महिलांनाही सहभागी करुन घेतले जात आहे. गॅस सिलिंडरला आग लागल्यास ओले बारदान सिलिंडरवर टाकून ही आग विझवता येते. त्याचबरोबर अग्निशमन सिलिंडरचा वापर करण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजनांवर माहिती देण्यात आली. आपत्कालिन स्थितीत वापरण्यात येणाऱ्या कटर यंत्राचीही माहिती देण्यात आली. या उपक्रमातून सिध्देश्वरनगरातील ३०० हून अधिक नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या समित्यांच्या बैठकीत चहापानावर लाखोंचा खर्च; निविदेविना बिले मंजूर होत असल्याचे उघड

Pune News: ईडब्ल्यूएस संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा; ‘अमृत’कडून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT