‘एमडीआर’ला ‘सिमा’चा विरोध
उद्योगांवर अतिरिक्त भार न लावण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २० ः डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी देशभरात यूपीआयचा वापर वाढत असतानाच दोन हजारांवरील निवडक यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) लागू करण्याचा प्रस्ताव उद्योग क्षेत्रासाठी नव्या खर्चाचे ओझे ठरणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यावर शुल्क लावण्याच्या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा, उद्योग व एमएसएमी क्षेत्राला पूर्णपणे वगळावे, अशी मागणी सिन्नर इंडस्ट्रिअल ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा) ने केली आहे.
.............
१५ ऑक्टोबरपासून ‘एमडीआर’ लागू होणार असून, त्यापूर्वीच केंद्राने उद्योग क्षेत्राची भूमिका विचारात घ्यावी, अशी मागणी ‘सिमा’ने केली आहे. डिजिटल पेमेंट व्यवस्थेला उद्योगांनी स्वीकारले असून, व्यवहार पारदर्शक केले आहेत. त्यामुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे. आता याच डिजिटल व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लावणे योग्य नसल्याचे ‘सिमा’चे सचिव बबन वाजे यांनी म्हटले आहे. सरकारने या मागणीचा विचार करावा, असे ‘सिमा’चे राहुल नवले, लक्ष्मण डोळे, सतीश नेहे, शांताराम दारूंटे, सुधीर जोशी, नवनाथ नागरे, दत्ता नवले, प्रमोद कुटे, अरुण खालकर, नीलेश सोनवणे, गणेश तटाणे, सारंग कुलकर्णी आदींनी म्हटले आहे.
‘एनपीसीआय’च्या प्रस्तावित चौकटीत दोन हजारांपेक्षा अधिक रकमेच्या निवडक परसन ते मर्चंट व्यवहारावर ०.४ टक्के एमडीआर आकारला जाणार आहे. ग्राहकांकडून थेट शुल्क आकारले जाणार नसले तरी या शुल्काचा परिणाम मर्चंटच्या व्यवहार खर्चावर होणार असल्याचे ‘सिमा’चे विश्वस्त मारुती कुलकर्णी यांनी म्हटले आहे. उद्योग क्षेत्रात कच्चा माल, सुटे भाग, वाहतूक, देखभाल, दुरुस्ती, विविध सेवा आणि पुरवठादारांना मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट करावे लागते. त्यामुळे एकूण व्यवहार खर्चात वाढ होणार असल्याचे ‘सिमा’चे अध्यक्ष सुकुमार नायर यांनी निवेदनात म्हटले आहे.
लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अशी मागणी ‘सिमा’चे विश्वस्त रतन पडवळ यांनी केली आहे. उद्योग, उत्पादन, अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल, सेवा आणि व्यापार क्षेत्रातील व्यावसायिक व्यवहारांसाठी झीरो एमडीआर व्यवस्था लागू करण्याची मागणी ‘सिमा’चे उपाध्यक्ष किरण भंडारी यांनी केली आहे. तर डिजिटल पेमेंट इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यायी आर्थिक व्यवस्था करावी, अशी मागणी अरुण चव्हाणके यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.