दोन्ही फोटो घ्यानववेत...
फोटो- 22794, 22796
१) सिन्नर ः आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयाबाहेर रविवारी ठिय्या आंदोलन करताना धोंडबार, औंढेवाडी येथील ग्रामस्थ.
२) सिन्नर ः खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करताना ग्रामस्थ.
रस्त्यासाठी आमदार, खासदारांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या
धोंडबार, औंढेवाडी रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २० ः कोनांबे-धोंडबार-औंढेवाडी व धोंडबार ते पाचपट्टा हे रस्ते तातडीने करावेत, नदीजोड प्रकल्पात धोंडबार, औंढेवाडीचा समावेश करावा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, या मागणीसाठी धोंडबार व औंढेवाडी या दोन गावांतील ग्रामस्थांनी रविवारी (ता. २०) आमदार माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. या वेळी निवेदन देण्यात आले.
राहुल साबळे, सागर खेताडे, राजेश शिंदे, दीपक खेताडे, निर्मला साबळे, वनिता खेताडे, मंदा खेताडे, शकुंतला खेताडे, शोभा घाडे, वृषाली साबळे, किरण खेताडे, गौरी जाधव, वंदना साबळे, शिवाजी खेताडे, गौरी जाधव, संगीता नाडेकर, निकिता खेताडे, सरला खेताडे, मीना गोडे यांच्यासह १०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
१५ दिवसांत प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास सिन्नर-घोटी महामार्गावरील हरसूल फाटा येथे ५ ऑक्टोबरला रास्ता रोको करण्यात येणार आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांना, तर आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयास निवेदन दिले.
१४ वर्षांपासून रस्त्याचे काम प्रलंबित आहे. अतिशय खराब रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून संबंधित विभागाला निवेदने दिली आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. जीव धोक्यात घालून वाहनधारक प्रवास करत आहेत. रुग्णांना, गर्भवतींना वेळेत दवाखान्यात नेणे शक्य होत नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचीही गंभीर अवस्था आहे. जनावरांनाही पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, नदीजोड प्रकल्पात दोन्ही गावांचा समावेश करावा व ही कार्यवाही १५ दिवसांत व्हावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.