नाशिक

सिन्नरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

CD
पान-३ मेन सिनन्नरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला जिवंत, यांत्रिक देखाव्यांवर मंडळांचा भर; सायंकाळनंतर जत्रेचे स्वरूप सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २० ः शहरात सध्या गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत असून, दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. शनिवार व रविवारच्या सलग सुट्यांमुळे नागरिकांनी गणरायाच्या दर्शनासाठी आणि सामाजिक, पौराणिक, प्रबोधन करणारे देखावे पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेले भव्य देखावे आणि रोषणाईने संपूर्ण सिन्नर शहर उजळून निघाले आहे. सायंकाळनंतर या गर्दीला जत्रेचे स्वरूप येत असून, रात्री उशिरापर्यंत मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दीच गर्दी दिसून येत आहे. ............... शहरातील विविध मंडळांनी धार्मिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जिवंत व यांत्रिक देखाव्यांवर भर दिला आहे. यात पारंपरिक ‘वटसावित्रीचा देखावा’ महिला भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तर ‘संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन देखावा’ जिवंत आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत आहे. अजिंक्य तारा येथील चौकाचा राजा येथील आनंद मेळ्यात विविध खेळांना भाविकांची दाद मिळत आहे. देखावे पाहण्यासाठी केवळ सिन्नर शहरातूनच नव्हे, तर ग्रामीण भागातूनही नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. यंदाच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विविध मंडळांतर्फे होत असलेले मनोरंजक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ''खेळ पैठणीचा'' हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी ठरत असून, त्यात शेकडो महिलांनी उत्साहाने भाग घेतला आहे. यासोबतच चिमुकल्यांसाठी संगीत खुर्ची, पारंपरिक नृत्य स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल शहरात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमांमुळे गणेशोत्सवातील आनंद द्विगुणित झाला आहे. नगर परिषदेनेही गणेशोत्सवामुळे वृक्षारोपण, आग प्रतिबंधक उपाययोजना यावर भाविकांना चौकाचौकातील गणेश मंडळांसमोर जनजागृती उपक्रम सुरू केले आहेत. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मुख्याधिकारी अभिजित कदम, उपनगराध्यक्षा हर्षद देशमुख यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या उपक्रमांचे शहरात स्वागत केले जात आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या उत्सवामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. एकूणच, सिन्नरकरांचा हा गणेशोत्सव भक्ती, कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT