नाशिक

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करावे उद्योजक सतिश नेहे यांचे प्रतिपादन

CD
(टीप – सदरची बातमी जाहिरातदाराची आहे.) --- विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करावे उद्योजक सतीश नेहे ः मातोश्री कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २२ ः आजच्या स्पर्धात्मक युगात उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, अभ्यासासोबत विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करावा, असे प्रतिपादन उद्योजक सतीश नेहे यांनी केले. एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड रिसर्च सेंटर येथे इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्योजक नेहे म्हणाले, की शैक्षणिक प्रगतीसोबतच कौशल्य विकास, करिअर नियोजन, शिस्त, वेळेचे नियोजन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि व्यक्तिमत्त्व विकास हेही महत्त्वाचे आहे. फक्त पदवी मिळविणे हे ध्येय नसून ज्ञान, कौशल्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून उत्तम अभियंता आणि उत्तम नागरिक बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. रेलकर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. पालकांनी विद्यार्थ्यांवर केवळ गुण आणि परीक्षेचा दबाव न टाकता त्यांच्या आवडी, क्षमता आणि कौशल्ये ओळखून त्यांना योग्य दिशा व प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. मानव संसाधनप्रमुख जंगम यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाचा मर्यादित व विधायक वापर करावा, वेळेचे योग्य नियोजन करावे, अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकून पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी, असे आवाहन केले. या वेळी उपप्राचार्य डॉ. धमाल, संगणक विभागप्रमुख कातकाडे, प्रा. झाल्टे, प्रा. अहिरे, मानवी संसाधनप्रमुख सोमनाथ जंगम, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT