नगर परिषद कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
दहा हजार सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मंजूर
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ४ : नगरपरिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
शिवसेना गटनेते मनोज देशमुख यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यास नगरसेवक ॲड. पंकज जाधव यांनी अनुमोदन दिले. नगरसेवकांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. गटनेते देशमुख यांनी कर्मचारी वर्षभर शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते आणि अन्य नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. सण-उत्सवांच्या काळातही अनेक कर्मचाऱ्यांना आपली सेवा बजावावी लागते. त्यामुळे त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून दिवाळीच्या निमित्ताने आर्थिक स्वरूपात प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
देशमुख यांनी बारामती व निफाड नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा संदर्भ सभागृहात दिला. सिन्नर नगरपरिषदेनेही त्याच धर्तीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.