नाशिक

चांदवड जवळ अठरा पिकप जीपमधून 45 गो वंशाची कत्तलीसाठी चोरटी वाहतूक करताना 55 लाख 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत. 18 संशयित इसमांना घेतले ताब्यात

CD
गोवंशाची चोरटी वाहतूक करणाऱ्या १८ संशयितांना ताब्यात सकाळ वृत्तसेवा सोग्रस, ता. ९ : चांदवड तालुक्यातील मंगरूळ फाट्यावर शनिवारी (ता. ५) पहाटे कत्तलीच्या हेतूने १८ पिकअप जीपमधून ४५ गोवंशीय जनावरांची चोरटी वाहतूक करणाऱ्या १८ संशयितांना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत १८ पिकअप जीप व ४५ गोवंशीय जनावरे असा एकूण ५५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चांदवड-तळवाडे रस्त्यावरून गोवंशीय जनावरांची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगरूळ फाट्यावर १८ पिकअप जीप अडवून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनांची तपासणी केली असता प्रत्येक वाहनात जनावरे निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या जनावरांची किंमत सुमारे दीड लाखाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वाहनचालक गणेश मधुकर शेवरे, नंदू वाघू शिंदे, जगदेव दत्तू शेवरे, योगेश गुणाजी बंडवे, गणेश विठ्ठल गोकुळे, मुरलीधर महादू भोई, भास्कर पुंडलिक दिघे, दिनकर जयराम गांगोडे, पंकज प्रभाकर पवार, ज्ञानेश्वर सुखदेव गुंजाळ, मंगेश दीपक गायकवाड, रोशन खंडेराव आहेर, राजेंद्र विष्णू धनाईत, नवनाथ रघुनाथ पवार, हेमराज रामदास कहाने, दिनेश रमेश घुले, अभिमन्यू त्र्यंबक पवार व दीपक सीताराम खरे यांना ताब्यात घेतले. संशयितांकडे जनावरांच्या वाहतुकीची परवानगी, खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र तसेच जनावरांच्या मालकीबाबतची माहिती मागविण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे किंवा ठोस माहिती मिळाली नाही. ही कारवाई गोरक्षक भरत सूर्यवंशी, अक्षय शिरसागर, मेघराज पवार व किरण सूर्यवंशी यांच्या मदतीने करण्यात आली. कारवाईनंतर जप्त केलेली गोवंशीय जनावरे मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील गोशाळेत पाठविण्यात आली. पोलिस कर्मचारी सदानंद वानखेडे यांनी चांदवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी अनिल शिरसाठ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A Squad: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार हार्दिक पांड्या; ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय अ संघ जाहीर

DK Shivakumar: मंत्र्यावर EDची रेड पडताच मुख्यमंत्री डीके शिवकुमार संतापले; म्हणाले, आता आम्ही घाबरणार नाही...

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Numerology: बुध ग्रहाचा प्रभाव अन् तल्लख बुद्धी! तर्कशक्तीत असतात पटाईत; 'या' मूलांकाच्या लोकांमध्ये असते प्रचंड Curiosity....

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

SCROLL FOR NEXT