सदृढ शरीर हिच मोठी संपत्ती
सोनवणे ः ऑलम्पिक दिन कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता.२३ : यशाचे शिखर गाठायचे असेल तर सुदृढ आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती असून, निरोगी शरीर आणि सकारात्मक दृष्टीकोनाच्या बळावरच मोठी उद्दिष्टे साध्य करता येतात, असे प्रतिपादन शिवसेना संघटक लालचंद सोनवणे यांनी आज येथे केले.
येथील महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे जागतिक ऑलिंपिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. अनिल पाटील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र वसाईत, प्रा. राहुल सोनवणे, शरद शेवाळे, संदीप बागुल, सचिन देवरे, प्रा. नानासाहेब निकम आणि प्रा. दिपक दळवी उपस्थित होते.
सोनवणे म्हणाले, खेळ क्षेत्रातही उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असून जिद्द, मेहनत आणि उत्तम आरोग्याच्या जोरावर लाखो रुपयांचे यश संपादन करता येते. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या पी. टी. उषा, कविता राऊत आणि खाशाबा जाधव यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समोर ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य प्रा. अनिल पाटील यांनी भारताच्या ऑलिंपिकमधील ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेतला. प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम यांनी ऑलिंपिक चळवळीचे महत्त्व सांगितले. प्रा. नीलेश शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. राहुल सोनवणे यांनी आभार मानले.
सटाणा : ऑलिंपिक दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना संघटक लालचंद सोनवणे, प्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ.नरेंद्र निकम, प्रा. राहुल सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.