नाशिक

लोकक्रांतीचा आदर्श नमुना

CD
मेन फिचर लोकसहभागातून दीड किलोमीटरचा रस्ता विंचुरे, वटार, डोंगरेज ग्रामस्थांचा श्रमदानाचा आदर्श अंबादास देवरे सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. २४ : बागलाण तालुक्यातील विंचुरे, वटार आणि डोंगरेज या तीन गावांतील शेतकऱ्यांनी एकजुटीच्या बळावर आणि श्रमदानाच्या माध्यमातून अशक्यप्राय वाटणारे काम करून दाखविले आहे. ज्या दुर्गम भागात पायवाटही नव्हती, त्या ठिकाणी तब्बल दीड किलोमीटर लांबीचा आणि २० फूट रुंद रस्ता उभारून ग्रामीण विकासाचा आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे शेकडो शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांची सोय झाली. विंचुरे, वटार आणि डोंगरेज गावांच्या सीमेवरील शेतजमिनींकडे जाण्यासाठी अनेक वर्षांपासून कोणताही अधिकृत अथवा व्यवहार्य रस्ता उपलब्ध नव्हता. शासकीय नोंदी, सातबारा अथवा शिवार नकाशामध्येही रस्त्याचा उल्लेख नव्हता. परिणामी शेतकरी आणि नागरिकांना शेतीकामांसह दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनत होती. चार ते सहा महिने गुडघाभर पाण्यातून सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत होते. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. विषारी सापांचा वावर, निसरडे खडक आणि अपघातांचा धोका यामुळे परिसरातील नागरिक कायम चिंतेत होते. तीन गावाचा लोकसहभाग ही समस्या लक्षात घेऊन विंचुरे येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते दीपक बच्छाव यांनी तिन्ही गावांतील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर लोकसहभागातून आर्थिक मदत, जेसीबी आणि ट्रॅक्टरची व्यवस्था करीत श्रमदानातून रस्त्याचे काम अल्पावधीत पूर्णही करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी कोणताही रस्ता अस्तित्वात नव्हता, त्या ठिकाणी हा मार्ग निर्माण करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदण्यात आले असून पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. अडथळेही दूर रस्त्याचे काम पूर्ण करताना अनेक अडथळ्यांवर मात करावी लागली. दोन शेतकऱ्यांच्या विहिरी बुजवाव्या लागल्या, तर एका शेतकऱ्यास नवीन विहीर बांधून देण्यात आली. रस्त्यातील पत्र्याचे शेड हटविण्यात आले. परस्पर सामंजस्य आणि विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न सोडवून अखेर रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. दीपक बच्छाव यांनी नियोजन, समन्वय आणि नेतृत्व केले. आमदार दिलीप बोरसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख प्रदीप बच्छाव, युवा नेते बंटी बोरसे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद भामरे, वटारचे सरपंच मच्छिंद्र खैरनार, डोंगरेजचे सरपंच बापू खैरनार यांचे सहकार्य लाभले. कोट या रस्त्याचे खडीकरण आणि पुढे डांबरीकरण स्थानिक विकास निधीतून करण्यात येईल. - दिलीप बोरसे आमदार सटाणा : श्रमदान व लोकसभागातून तयार झालेला दीड किलोमीटर रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT