नाशिक

बँकेची पाव पान जाहिरात वर्धापन दिनाला होती बातमी घ्यावीच ही विनंतीन

CD
बँकेच्या शाखाविस्ताराला सभासदांचा एकमुखी पाठिंबा सटाणा मर्चंटस बॅकेचा सभासदांना १५ टक्के लाभांशाचा निर्णय सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. ७ : सटाणा मर्चंटस् को-ऑप. बँकेच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या गावांमध्ये नवीन शाखा सुरू करण्यासह मुख्य कार्यालयाचे संगणकीकरण व अद्ययावत नूतनीकरण करण्याच्या प्रस्तावांना सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखी पाठिंबा दिला. सभासदांच्या सूचनांचा आदर करून मागणीनुसार कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष दिलीप येवला यांनी दिली. येथील सप्तपदी लॉन्समध्ये बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी दिलीप येवला होते. प्रारंभी प्रतिमापूजन करून दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालक पंकज ततार यांनी स्वागत केले, तर संचालक सचिन कोठावदे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य व्यवस्थापक देविदास बागडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले. त्यास सभासदांनी मंजुरी दिली. विषयपत्रिकेवरील १२ विषयांना एकमुखी मंजुरी देण्यात आली. गत आर्थिक वर्षासाठी सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्यास तसेच संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियमांच्या दुरुस्तींना मंजुरी देण्यात आली. ज्येष्ठ सभासद रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, जिभाऊ आबा सोनवणे, डॉ. विलास बच्छाव, प्रा. चंद्रकांत सोनवणे, नरेंद्र अहिरे, नरेंद्र मालपाणी, महेंद्र शर्मा, आण्णा काशिराम सोनवणे, सुभाष सोनवणे, शशिकांत कापडणीस, अंबादास देवरे, हेमंत जाधव, राजेंद्र अहिरे, रोहित तरटे, सचिन दशपुते यांनी चर्चेत सहभाग घेतला. व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे उपस्थित होते. संचालक जयवंत येवला यांनी आभार मानले. फोटो ओळी -सटाणा मर्चंट बँकेच्या वार्षिक सभेत बोलताना बँकेचे अध्यक्ष दिलीप येवला तर व्यासपीठावर संचालक मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! सिलिंडर वितरण नियमात बदल, बुकिंगमधील अंतर केले कमी

Tigress Captured : युवतीसह शेतकऱ्याला ठार मारणारी वाघीण जेरबंद

Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT