नाशिक

वर्धापन दिनासाठी संस्थेची पाव पान ग्लेज जाहिरात होती बातमी आवश्यक

CD
दोन कॉलमात घ्यावी --------------------------- महत्वाची आवश्यक ---------------- बागलाण एज्युकेशन सोसायटीची कार्यकारणी पाच वर्षांसाठी कायम ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. १६ : येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यमान संचालक मंडळालाच पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संस्थेच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १३) संस्थेच्या सभागृहात उत्साहपूर्ण व शांततेच्या वातावरणात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे होते. या ठरावामुळे विश्वास चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीने हॅट्ट्रिक केली असून, त्यांना सलग तिसऱ्यांदा पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. सुरुवातीस प्रास्ताविक व मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. संस्थेचे शाळा विकास अधिकारी नानासाहेब सोनवणे यांनी अजेंड्यावरील विषय सभेसमोर मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. विश्राम निकम, सुधाकर भामरे व ॲड. सतीश चिंधडे यांनी सहभाग घेतला. चर्चेनंतर अजेंड्यावरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. संस्थेचे सभासद सुरेश पाटील यांनी विद्यमान कार्यकारणीच पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्याचा ठराव मांडला. या ठरावाला रमेश देवरे, अंबादास कोठावदे व पी. टी. सोनवणे यांनी अनुमोदन दिले. कार्यकारणीत आवश्यकतेनुसार फेरबदल करण्याचा अधिकार कार्यकारणीला देण्यात आला. त्यानुसार अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे, उपाध्यक्षपदी जिभाऊ खंडू सोनवणे व ॲड. नितीन चंद्रात्रे, सचिवपदी अनिल राका, सहसचिवपदी संजय ब्राह्मणकर आणि खजिनदारपदी शरद ततार हे कायम राहणार आहेत.सभेत संस्थेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीचा आढावा पीपीटीद्वारे सादर करण्यात आला. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. ॲड. नितीन चंद्रात्रे व जिभाऊ सोनवणे यांनी संस्थेच्या भावी वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT