नाशिक

सततच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे ठाणगावकर हैराण ः कृत्रिम पाणीटंचाई

CD
THG26B01469 सिन्नर ः ठाणगाव परिसरातील विस्कळीत वीजपुरवठ्याबाबत वीज मंडळाच्या अभियंता हेमांगी पवार यांना निवेदन देताना उपसरपंच विलास मोरे, रामदास भोर यांच्यासह शिष्टमंडळ. --------------- पाणीसाठा असूनही ठाणगावसह पाच गावांचा पुरवठा विस्कळीत ------------ खंडीत विजेचा फटका ः नागरिक मेटाकुटीस ------------ सकाळ वृत्तसेवा ठाणगाव, ता. १४ ः महिनाभरापासून ठाणगाव परिसरातील वीजपुरवठा सतत विस्कळीत होऊ दीर्घकाळ खंडीत राहत आहेत. यामुळे ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत होत असल्याने उंबदरी धरणात पुरेसे पाणी असूनही गाव परिसरात दोन ते तीन दिवसांनी केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. मुबलक पाणी असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. विहिरीत जेमतेम पाणी असलेल्या शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना विजेअभावी पंप सुरु होत नसल्याने जनावरांना पिण्याचे पाणीही देता येत नाही. दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून वीज मंडळाकडून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. कधी कमी दाबाने तर कधी तासनतास वीजपुरवठा बंद होत असल्याने विजेचे उपकरणे बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जलशुद्धीकरण केंद्राला नियमित वीज मिळत नसल्याने गावात १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. नळाला पाणी सोडल्यावर वीजपुरवठा बंद राहत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. बॅंका, पतसंस्था व व्यावसायिकांना खंडीत वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीतर्फे उपसरपंच विलास मोरे यांनी सिन्नर येथील वीज अभियंता हेमांगी पवार यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजप नेते जयंत आव्हाड, अटल फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष रामदास भोर, बाळासाहेब मोरे, प्रमोद उगले, सुभाष शिंदे आदी उपस्थित होते. -----------------

ऋषभ पंतने अर्जुन तेंडुलकरला का खेळवलं नाही?" माजी क्रिकेटपटूचा रोखठोक सवाल, म्हणाला "धोनी-रोहित कुठे अन्...

Thailand Open 2026: थायलंडमध्ये भारतीय खेळाडूंचा धुमाकूळ! सिंधू आणि लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात एन्ट्री

UPSC Success Story: पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश; सोहम शेंडे यांची IFS अधिकारीपदी निवड, ग्रामीण भागातील युवकाची प्रेरणादायी यशोगाथा!

Shani Jayanti 2026 : शनि जयंतीला शनिदेवांसमोर हात जोडून नमस्कार का करू नये? मूर्तीसमोर का उभे राहू नये, जाणून घ्या

Petrol-Diesel Price Hike: इंधन दरवाढीनंतर महागाईचा भडका! भाजीपाला ते LPG पर्यंत सर्वकाही महागणार? पेट्रोल-डिझेल अजून किती वाढणार?

SCROLL FOR NEXT