सकाळ बातमीचा परिणाम
--
फोटो : B04875, B04876
डीजीपीनगर : ड्रेनेज साफसफाईचे सुरू असलेले काम.
बजरंगवाडी परिसरातील
ड्रेनेज चेंबर्सची साफसफाई
सकाळ वृत्तसेवा
डीजीपीनगर, ता. ७ : प्रभाग क्रमांक २३ मधील बजरंगवाडी परिसरात दूषित पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइन चोकअपच्या समस्येबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. माजी महापौर सतीश कुलकर्णी, नगरसेवक चंद्रकांत खोडे, सभापती मंगला नन्नावरे, नगरसेविका संध्या कुलकर्णी आणि दीपाली निकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्याची प्रशासनाने तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून परिसरातील ड्रेनेज चेंबर्सची पाहणी व साफसफाई करण्यात येत असून, चोकअप झालेल्या ड्रेनेज लाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दूषित पाणीपुरवठ्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून, पाण्याचे नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. या तपासणीच्या निष्कर्षानुसार दूषित पाण्याचे मुख्य कारण शोधून आवश्यक दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, परिसरात कमी दाबाने व अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्याचीही पाहणी केली जात आहे. सध्या ड्रेनेज साफसफाई व चोकअप दूर करण्याचे प्रत्यक्ष काम युद्धपातळीवर सुरू असून, पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत तातडीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत या समस्येतून नागरिकांची सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.