नाशिक

पोळा सणासाठी आठवडे बाजारात साहित्य खरेदीची लगबग

CD
(पान ४ ला ॲंकर) VAK26B01628 पळासनेर (ता. शिरपूर) : येथील आठवडेबाजारात बैलपोळ्यासाठी साहित्य खरेदी करतांना शेतकरी. ------------ पोळ्यासाठी आठवडे बाजारात खरेदीची लगबग सजावट साहित्याच्या दरात २० ते ३० टक्के वाढ; खरीप हंगामाच्या चिंतेतही शेतकऱ्यांचा उत्साह कायम सकाळ वृत्तसेवा वकवाड, ता. ६ : वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा पोळा सण गुरुवारी (ता. १०) उत्साहात साजरा होत आहे. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य, रंग आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी परिसरातील आठवडे बाजारात शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. मात्र, या संकटाच्या परिस्थितीतही पोळा सणाचा उत्साह कमी झालेला नाही. काळ्या आईची वर्षभर इमानेइतबारे सेवा करणाऱ्या ‘सर्जा-राजा’ची जोडी हेच घराचे वैभव मानणारे शेतकरी आपल्या लाडक्या बैलांच्या सजावटीसाठी मनापासून खरेदी करताना दिसत आहेत. पोळ्यानिमित्त पळासनेर (ता. शिरपूर) येथील आठवडे बाजारात बैलांच्या साज-शृंगाराचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले असून, बाजारपेठ गजबजली आहे. मध्यप्रदेशातील सेंधवा, पानसमल, धामनोद, मोहिदा, मालवन आदी भागांतील व्यावसायिकांनी विविध प्रकारचे साहित्य बाजारात आणले आहे. यामध्ये बैलांचे गळपट्टे, रंगीबेरंगी दोर, घुंगुरमाळ, मुसकी, शेल, म्होरकी गोंडा, पितळी शेंबी, कपाळ गोंडा, कवडी माळ, पैंजण, वेसण गोंडे, बेगडी, म्होरकी आदी वस्तूंचा समावेश आहे. दरवाढीची झळ, उत्साह मात्र कायम यंदा बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या किमतीत सुमारे २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. तरीही दरवाढीची फारशी पर्वा न करता शेतकरी आपल्या आर्थिक ऐपतीनुसार साहित्याची खरेदी करत आहेत. ग्रामीण भागातील पोळ्याची परंपरा आणि बैलांप्रति असलेली कृतज्ञतेची भावना यामुळे सणाच्या तयारीत उत्साह दिसून येत आहे. खरेदीसाठी शेमल्या, मोहिदा, दुर्बड्या, वकवाड, पनाखेड, सांगवी, जामण्यापाणी, खैरखुटी, आंबापाणी, हैद्रापाडा, घारबर्डी आदी गावांतील शेतकऱ्यांनी पळासनेर बाजारात गर्दी केली होती. बैलांच्या साज-शृंगाराची परंपरा कायम आधुनिक युगात शेतीच्या पद्धतीत मोठे बदल झाले असले, तरी पोळ्याच्या निमित्ताने बैलांना सजविण्याची आणि त्यांची पूजा करण्याची ग्रामीण भागातील परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी आणि खरीप हंगामाची चिंता असतानाही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पोळ्याचा उत्साह दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT