नाशिक

आठवडे बाजारात मान्सूनच्या पहिल्याच पावसाची जोरदार हजेरी; शेतकरी, व्यावसायिक अन् ग्राहकांची उडाली तारांबळ!

CD
फोटो- 12456, 12457 वणी ः येथे मंगळवारी जोरदार झालेल्या पावसाने आठवडे बाजारात पाण्यात बुडालेला भाजीपाला.. जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी सब होडींग.......... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ ः अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवार (ता. २२) पासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. जून संपत असताना झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चिंता मिटली असी तरी एन निनोचे संकंट कायम आहे. मंगळवारी (ता. २३) दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाने दमदारा हजेरी लावली. काही ठिकाणी पाऊस झाल्याने व्यावसायिकांची धावपळ झाली. ........ वणी आठवडे बाजारात तारांबळ वणी ः येथील मुख्य आठवडे बाजाराच्या दिवशीच मॉन्सूनच्या पहिल्यादांच जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारात आलेल्या शेतकरी, व्यावसायिक आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी अचानक दुपारी वणी परिसरात दमदार एन्ट्री केली. आज वणीचा मुख्य आठवडे बाजार असल्याने परिसरातील शेकडो शेतकरी व किरकोळ विक्रेते आपला माल विकण्यासाठी बाजारात आले होते. मात्र दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचावासाठी बाजारात पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आडोसा शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. भाजीपाला, फळे आणि इतर अन्नधान्य उघड्यावर असल्याने मोठ्या प्रमाणावर भिजले. अनेक शेतकऱ्यांचा कोथिंबीर, मेथी, टोमॅटो यांसारखा नाशवंत माल पाण्यात वाहून गेला. कपडे, कटलरी आणि इतर वस्तूंची दुकाने थाटलेल्या छोट्या व्यावसायिकांना आपला माल गोळा करायला वेळच मिळाला नाही. ताडपत्री बांधेपर्यंत बहुतांश माल ओला झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचेही पावसामुळे धावपळ झाली. .................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT