नाशिक

आझरखेड ग्रामपंचायतीकडून पाचशे फळझाडांची लागवड

CD
VNI26B12860 ओझरखेड ः ग्रामपंचायतीच्या पडीक गायरान जागेत तरुणांच्या सहकार्याने पाचशे केशर आंब्यांची लागवड करताना सरपंच गंगाधर निखाडे सह गावातील तरुण. ----------------- ३६-२ पाचशे केशर आंब्यांची ओझरखेड येथे लागवड ---------------- पर्यावरण संवर्धनासोबतच रोजगारालाही चालना सकाळ वृत्तसेवा वणी, ता.३१ ः ओझरखेड ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनासोबत गावाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तब्बल ५०० केशर आंब्यांच्या रोपांची लागवड केली आहे. ''झाडे लावा, झाडे जगवा'' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व तरुणांकडून स्वागत होत आहे. हवामान बदल आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या संवर्धनासाठी नियमित पाणी व सुरक्षेचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. पडीक गायरान जागेत लावलेल्या या फळझाडांमुळे भविष्यात हिरवाई वाढण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगार व आर्थिक उलाढालीला गती मिळणार आहे. सरपंच गंगाधर निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि तरुणांच्या सहभागातून हा उपक्रम पार पडला. ------------ कोट पर्यावरण संवर्धन आणि गावाचा आर्थिक विकास या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळून ग्रामपंचायतीचे उत्पन्नही वाढेल. ओझरखेडचे नाव राज्य पातळीवर पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. - गंगाधर निखाडे, सरपंच, ओझरखेड. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT