नाशिक

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने नर्मदेश्वर मंदिर दुमदुमले शिवलिंगास महाकालेश्वराचा मनोहारी शृंगार; वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात उत्साहात

CD
VNI26B12864 वणी ः नर्मदेश्वर महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग ------------------- ३०-२ श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात ------------ दिवसभर विविध धार्मिक विधी, अभिषेक ----------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.३१ : येथील कीर्ती नगरस्थित श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा वर्धापनदिन सोहळा तिसऱ्या श्रावणी सोमवारी (ता.३१) भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. सोमवार आणि वर्धापनदिनाचे औचित्य साधत दिवसभर मंदिरात विविध धार्मिक विधी, अभिषेक, पूजन व आरती झाली. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवभक्तांनी भक्तिभावाने शिवलिंगावर रुद्राभिषेक, जलाभिषेक व दुग्धाभिषेक करीत भगवान महादेवाची आराधना केली. शिवलिंग मूर्तीस महाकालेश्वर महादेवाचा आकर्षक व मनोहारी शृंगार करण्यात आला होता. फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई आणि धार्मिक वातावरणामुळे मंदिर परिसराला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते. श्रावणात भगवान शिवाची उपासना केल्यास मनःशांती, आध्यात्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पर्वणीवर नर्मदेश्वर महादेवाच्या चरणी माथा टेकण्यासाठी भाविकांची दिवसभर वर्दळ होती. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत शिवलिंगावर विधिवत अभिषेक करण्यात आला, त्यानंतर महाआरती करण्यात आली. घंटानाद, शंखनाद आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर शिवमय झाला होता. वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी ७.३० ते रात्री दहापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.त्यानंतर भक्तिमय भजनसंध्या झाली. शिवनामस्मरण आणि भजनाच्या स्वरांनी वातावरण अधिकच आध्यात्मिक होणार आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians च्या गोटातून ४ महत्त्वाच्या अपडेट्स! हार्दिक पांड्याचे कर्णधारपद गेल्यात जमा, पण...; रोहित शर्मा त्याचा माणूस बसवणार

Raju Shetti Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर टक्केवारीतला माणूस, ‘असेल दम तर टांगून दाखवाच’; राजू शेट्टींचा पलटवार, शक्तीपीठ महामार्गावरून संघर्ष तीव्र

याला म्हणतात हिशोब चुकता! अमराठी रिक्षावाल्याने शिवी दिली, वंदना गुप्तेंनी बाहुबलीसारखी थेट रिक्षाच पलटी केली

Marathi News Live Updates : पाकिस्तानच्या PMOनं पोस्टमधून मोदींचा फोटो हटवला

Redmi Smartphone: 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा! Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच; बजेट रेंजमध्ये प्रीमियम फीचर्स...

SCROLL FOR NEXT