फोटो- 12894
वणी ः येथील संताजी मंदिर सभागृहात रुद्रपूजा करताना स्वामी दिलीप रॉय व उपस्थित भाविक.
आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे
वणीला श्रावण रुद्रपूजा
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ६ ः वैदिक मंत्रोच्चार, ध्यान, सत्संग आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात श्रावणातील विशेष महत्त्वाची श्रावण रुद्रपूजा वणी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे संताजी महाराज मंदिराच्या सभामंडपात झाली. ‘श्री रुद्रम’च्या मंगलमय मंत्रघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमातील स्वामी दिलीप रॉयजी यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला. वाराणसी येथील पं. अविनाश मिश्रा व रविकांत मिश्रा यांच्या मंत्रोच्चाराने पूजास्थळी आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले. श्रावणात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. शिवतत्त्व हे शांती, चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. ‘श्री रुद्रम’मधील मंत्रोच्चारातून वातावरणातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळते, अशी आध्यात्मिक संकल्पना स्वामींनी समजावून सांगितली. रुद्रपूजेमुळे मनाची एकाग्रता, अंतर्मुखता आणि आत्मिक शांतीचा अनुभव घेता येतो, असेही त्यांनी सांगितले. पूजा, ध्यान आणि सत्संग यांचा त्रिवेणी संगम असलेल्या या सोहळ्यात वणीसह पंचक्रोशीतील भाविकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास दिंडोरी येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक प्रताप बनकर, दिनकर काठे, राजेंद्र डोखळे, वणीचे प्रशिक्षक पोपट वाघ यांनी मार्गदर्शन केले. पिंपळगाव येथील आर्ट ऑफ लिव्हिंग सत्संग मंडळाच्या सदस्यांनी सादर केलेल्या भक्तिमय सत्संगाने वातावरण अधिकच प्रसन्न झाले. भक्ती, साधना आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देणाऱ्या या रुद्रपूजेची सांगता मंगलमय वातावरणात झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.