नाशिक

मार्कंडेय पर्वतावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही बंदी! प्रशासनाचा ‘बंदी’चाच कित्ता; चार वर्षांत कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत, भाविकांमध्ये संताप

CD
पान-१ फोटो---सिंगल VNI26B12966 ः मार्कंडेय पर्वत. ------------ मार्कंडेय पर्वतावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही बंदी ------------ प्रशासनाचा ‘बंदी’चाच कित्ता; चार वर्षांत कायमस्वरूपी उपाययोजना नाही, भाविकांमध्ये संताप ------------ सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १४ : मार्कंडेय ऋषींची पावन तपोभूमी आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावरील ऋषीपंचमी यात्रोत्सवावर प्रशासनाने यंदाही बंदी कायम ठेवली आहे. मंगळवारी (ता.१५) होणाऱ्या यात्रेसाठी मार्कंडपिंपरी ग्रामस्थ, सरपंच व पंचकमेटीने यात्रा भरविण्याची मागणी केली होती. मात्र, पर्वतावरील जीर्ण लोखंडी शिड्या, अरुंद व निसरड्या पायवाटा आणि संभाव्य दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी पर्वतावर जाण्यास मनाई केली आहे. भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंत दर्शनाची मुभा देण्यात आली आहे. -------------- दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने मार्कंडेय पर्वताची वाट धरतात. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून भाविक यात्रेसाठी येतात. सोमवती अमावस्या आणि ऋषीपंचमी हे येथील प्रमुख यात्रेचे दिवस मानले जातात. चार वर्षांपासून सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे ‘दरवर्षी बंदी घालण्यापेक्षा धोकादायक मार्ग कायमस्वरूपी सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने काय केले? असा प्रश्न आता भाविकांकडून उपस्थित होत आहे. --------- १६-१ चार वर्षे ‘बंदी’; प्रश्न जैसे थे! पर्वतावर जाणाऱ्या मार्गावरील लोखंडी शिड्या व पायऱ्या जीर्ण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. सपाटी भागाजवळील लोखंडी जिना तुटलेल्या अवस्थेत असल्याचा अहवाल ७ सप्टेंबरला प्रशासनाला प्राप्त झाला. अरुंद मार्गावर मोठी गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी, पाय घसरून पडणे तसेच दगड कोसळण्याचा धोका असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांत जीर्ण शिड्या बदलणे, मजबूत जिना उभारणे, पायवाट रुंद व सुरक्षित करणे, संरक्षक कठडे बसविणे, सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी निधी व प्रशासकीय यंत्रणा का राबविण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाची सुरक्षेबाबतची भूमिका योग्य असली तरी बंदी हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही, अशी भावना भाविकांमध्ये आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

दगडूशेठ बाप्पाला हे नाव कसं मिळालं? जाणून घ्या दगडूशेठ हलवाईंची कहाणी

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

SCROLL FOR NEXT