पान एक
-----------------
12975
मंदाकिनी सोनवणे
लखमापूर खून प्रकरणात संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १६ : लखमापूर (ता. दिंडोरी) येथील मंदाकिनी हरिभाऊ सोनवणे (वय ७०) यांच्या खून प्रकरणी सुरू असलेल्या तपासाला यश मिळाले आहे. खून प्रकरणी अटकेत असलेल्या दोघा संशयितांकडून पोलिसांनी ८ लाख ५७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंदाकिनी सोनवणे या २८ ऑगस्टपासून लखमापूर येथील त्यांच्या घरातून बेपत्ता होत्या. त्यानंतर ५ सप्टेंबरला घरापासून काही अंतरावर असलेल्या शेततळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांचे हात-पाय बांधलेले तसेच तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला आढळल्याने हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. या खून प्रकरणी वणी पोलिसांनी सागर गणपत गांगोडे (वय २६, रा. म्हेळुस्के, हल्ली लखमापूर) आणि सुनील दत्तू गांगोडे (वय २४, रा. भनवड, ता. दिंडोरी) यांना अटक केली होती. सागर गांगोडे हा गेल्या पाच-सहा वर्षांपासून मंदाकिनी सोनवणे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता.
-----------
८ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिस तपासादरम्यान मंदाकिनी सोनवणे यांच्या घरातून चोरीला गेलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख ५७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. वणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र फड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.