---------------------
मादी बिबट्यासह बछडा
उपचारासाठी नाशिकला
-----------
वणी, ता.१८ : वणी-कळवण रस्त्यालगत सुनील रामदास बर्डे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ५९५ मधील शेतात आजारी अवस्थेत बिबट मादी आढळून आली. मादीसोबत नुकतेच जन्मलेले बछडेही होते. त्यापैकी एक बछडा मृतावस्थेत मिळून आला. मादीसह इतर बछड्यांना वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने ताब्यात घेऊन नाशिक येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे रवाना केले.
---------------
वणी- कळवण रस्त्यालगत बर्डे यांच्या शेतात सकाळी साडेसहाच्या सुमारास शेतमजूर टोमॅटो पिकाकडे जात असताना ओहळालगतच्या कपाटीकडून गुरगुरण्याचा आवाज आला. तिकडे पाहिले असता मजुराला बिबट्या दिसला. तातडीने वनविभागाला कळविल्यानंतर वनरक्षक झिरवाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान बिबट मादीसोबत बछडे असल्याचे निदर्शनास आले. मादीची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे दिसून आले. वनपरिक्षेत्राधिकारी (दिंडोरी प्रादेशिक) सुशांत पाटील यांनी म्हसरूळ येथील रेस्क्यू पथकाला पाचारण केले. पथकातील शुटरने मादीला ट्रँक्विलायझर गनच्या साह्याने बेशुध्द करीत बिबट मादीचे सुरक्षितपणे रेस्क्यू केले. मादी अंदाजे पाच ते सहा वर्षांची असून, बछडे दोन ते तीन दिवसांचे असल्याचे दिसून आले. मादीसह जिवंत बछड्याला नाशिक येथील टीटीसी केंद्रात हलविण्यात आले.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.