नाशिक

पर्युषण महापर्वाचा भक्तिमय वातावरणात समारोप बाल-युवा तपस्वींचा भव्य वरघोडा; ‘मिच्छामी दुक्कडम्’ म्हणत जैन बांधवांची क्षमायाचना

CD
फोटो फक्त दोन कॉ VNI26B12988 वणी ः पर्युषण महापर्वाच्या सांगताप्रसंगी उपवास करणाऱ्या तपस्वींची काढण्यात आलेला वरघोडा व पालखी ------------------ पर्युषण महापर्वाचा भक्तिमय सांगता ------------ वणी येथे वरघोडा मिरवणूक उत्साहात ः जैन बांधवांकडून क्षमायाचना ---------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१८ : वणी येथील श्री शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा भक्तिमय वातावरणात सांगता झाली. पर्वाच्या सांगतानिमित्त विविध कठोर तपश्चर्या करणाऱ्या बाल व युवा तपस्वींचा वरघोडा (शोभायात्रा) गुरुवारी (ता. १७) ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आला. जैन बांधवांनी एकमेकांची क्षमायाचना करत ‘मिच्छामी दुक्कडम्’चा संदेश दिला. ------------ पर्युषण पर्वानिमित्त येथील श्वेतांबर जैन मंदिर तसेच श्री शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्राची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पर्वाच्या कालावधीत अष्टान्हिका प्रवचन, कल्पसूत्र व बारसा सूत्र ग्रंथांचे वाचन, पूजाअर्चना, धार्मिक विधी तसेच भजन संध्यांचे आयोजन करण्यात आले. गच्छस्थवीर आचार्य भगवंत श्री ललितशेखर सूरीश्वरजी तसेच साध्वी भगवंत दीप्तीरत्ना श्रीजी यांचे पावन सानिध्य लाभले. येथील जैन पाठशाळेेपासून ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पालखी तसेच पर्युषण पर्वात विविध प्रकारचे तप करणारे लव्या पारख, परी बोथरा, नेत्रा बोथरा, सौम्या बोथरा, रिधिमा पारख, प्रीत सिसोदिया, रिदम पारख, दीक्षिता समदडिया, मेघा समदडिया, विरेषा संचेती, युगम पारख, गाथा पारख, देवांश समदडिया, हार्दिक समदडिया, खुशी बोथरा, विरम बोथरा, सरलाबाई इंदरचंदजी बोरा व वैभव इंदरचंदजी बोरा या तपस्वींची आकर्षक रथ, सजविलेल्या कारमधून वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. भगवान महाविरांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. रथ व वाहनांमध्ये आरूढ बाल तपस्वींवर ग्रामस्थांनी अक्षता व फुलांची उधळण केली. शोभायात्रेची सांगता श्री शंखेश्वर पार्श्वभ्युदय मंदिरात झाली. वर्षभरात परस्परांमध्ये निर्माण झालेले मतभेद, वैरभाव व कटुता विसरून एकमेकांची क्षमा मागावी, तसेच सर्व प्राणीमात्रांप्रती दया व समभाव ठेवावा, असा संदेश देण्यात आला. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT