नाशिक

रडतोंडी घाटाला पर्याय कागदावरच; १.५५ कोटींच्या सर्वेक्षण प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा

CD
पान-१ मेन आहे. ------------------ VNI26B13004 वणी ः सप्तशृंगगडाचे साठ पायरी (रडतोंडी) बाजूचे छायाचित्र. ------------------ रडतोंडी घाटाला पर्याय कागदावरच ----------- १.५५ कोटींच्या सर्वेक्षण प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा, कुंभमेळ्यातील गर्दीवर पर्याय हवा --------------- दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१९ : सप्तशृंगगडाच्या घाटातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रस्तावित पर्यायी चंडीकापूरमार्गे रडतोंडी घाटरस्ता अद्याप कागदावरच राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण, भूसंपादन, वनजमीन संपादन, भू-तांत्रिक तपासणी, आराखडा व अंदाजपत्रकासाठी १ कोटी ५५ लाख ३७ हजार २३३ रुपयांचा प्रस्ताव तयार करून सुमारे सहा महिन्यांपूर्वी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण व जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. मात्र, प्रशासकीय मंजुरीअभावी पुढील प्रक्रिया ठप्प आहे. --------------- सप्तशृंगगड हे देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असून वर्षभर मोठ्या संख्येने भाविक गडावर येतात. रडतोंडी घाटात पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता निसरडा होणे आणि वाहतूक विस्कळित होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे सुरक्षित वाहतुकीसाठी पर्यायी घाटरस्ता उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मात्र, प्रस्ताव तयार झाला, निधीचा अंदाज तयार झाला; आता केवळ मंजुरीच्या प्रतीक्षेत हा महत्त्वाचा प्रकल्प अडकला आहे. १६-१ काय आहे प्रस्तावात? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात प्राथमिक सर्वेक्षण, ट्रायल पिट, ड्रोन सर्वेक्षण, टोटल स्टेशन सर्वेक्षण, नाल्यांचे सर्वेक्षण, भू-अभियांत्रिकी व मृदा तपासणी, रस्त्याचा सविस्तर आराखडा, भौमितिक रचना, डिझाइन, ऑटोकॅड रेखांकन तसेच भूसंपादन व वनजमीन संपादनासाठी आवश्यक कार्यवाहीचा समावेश आहे. १६-१ प्रस्तावातील तरतूद अशी प्रस्तावित खर्चात सर्वेक्षणासाठी २८ लाख ३४ हजार ३६२ रुपये, भूसंपादनासाठी ८१ लाख ८६ हजार ९५१ रुपये, भू-तांत्रिक व मृदा सर्वेक्षणासाठी ५ लाख ६३ हजार ६५९ रुपये आणि डिझाइन, अंदाज व रेखांकनासाठी १४ लाख ७१ हजार ५२६ रुपये प्रस्तावित आहेत. विविध कर व इतर बाबींसह एकूण प्रस्तावित रक्कम १ कोटी ५५ लाख ३७ हजार २३३ रुपये आहे. २०-२ चौकट घाट बंद; पर्यायी मार्गाची गरज सध्या घाटरस्त्याच्या कामामुळे शनिवार व रविवार वगळता २६ सप्टेंबरपर्यंत रडतोंडी घाट बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनाने सप्तशृंगगडावर जाणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, पर्यायी घाटरस्ता अस्तित्वात असता तर मुख्य घाट बंद असतानाही वाहतुकीसाठी दुसरा मार्ग उपलब्ध झाला असता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडाकडे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षित व सक्षम वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पर्यायी घाटरस्त्याच्या प्राथमिक सर्वेक्षणालाच मंजुरी मिळत नसेल, तर प्रत्यक्ष रस्ता कधी अस्तित्वात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ------------ २०-२ चौकट लोकप्रतिनिधींचा हवा पाठपुरावा पर्यायी घाटरस्त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, दादा भुसे, खासदार भास्कर भगरे तसेच आमदार नितीन पवार यांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधित यंत्रणेकडे तातडीने पाठपुरावा करण्याची गरज आहे. प्रशासनाने प्रस्तावाला मंजुरी देऊन सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू करावे आणि त्यानंतर भूसंपादन व प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी भाविक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

SCROLL FOR NEXT