पान-२ साठी
VNI26B13010
वणी ः
VNI26B13011
वणी ः
VNI26B13012
वणी ः
----------------------
गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रमांना बळ
वणीत स्त्रीशक्तीचा जागर रक्तदान, मोफत नेत्रतपासणीसह विद्यार्थ्यांसाठी स्पर्धां
-------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.२१ : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने वणी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी यंदा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांवर भर दिला आहे. होम मिनिस्टर, आरोग्य शिबिरे, रक्तदान, मोफत नेत्रतपासणी तसेच विद्यार्थ्यांसाठी नृत्य, निबंध, वक्तृत्व, रांगोळी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
-------------
गणेशोत्सवानिमित्त मंडपांची सजावट, आकर्षक आरास आणि रोषणाईमुळे शहरातील प्रमुख परिसर उजळून निघाला आहे. शिवनेरी फ्रेंड सर्कल, संताजी मित्र मंडळ, संस्कृतीनगर मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक उपक्रम घेण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, रांगोळी, निबंध, वक्तृत्व यांसह विविध स्पर्धांवर भर देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
संस्कृतीनगर सार्वजनिक गणेश मित्रमंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ (शनि चौक), मोरया फ्रेंड सर्कल (वणी), वक्रतुंड फ्रेंड सर्कल (बाजारगल्ली, कसबे वणी) आणि कोळीवाडाचा राजा मित्र मंडळ यांनीही आकर्षक गणेशमूर्तींची स्थापना केली आहे. काही मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची सुमारे पाच ते बारा फुटांपर्यंत असून, आकर्षक आरास व रोषणाईने परिसराचे सौंदर्य वाढले आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक उपक्रम, आरोग्यविषयक जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा मंडळांचा प्रयत्न यंदाच्या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरत आहे.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.