नाशिक

वणी उपबाजारात टोमॅटो लिलावाचा शुभारंभ, १ क्रेटला १ हजार ८०१ रुपयांचा मिळाला शुभारंभा भाव..

CD
पन-२ा मेन --------- VNI26B13020 वणी ः दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात टोमॅटो लिलावाचा शुभारंभाप्रसंगी टॉमेटो क्रेटचे पूजन करताना सभापती प्रशांत कड, संचालक मंडळ व व्यापारी. ------------ वणी उपबाजारात टोमॅटो लिलाव एक क्रेटला एक हजार ८०१ रुपयांचा मिळाला शुभारंभाचा भाव ---------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.२१ : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी येथील उपबाजार आवारात चालू हंगामातील टोमॅटो लिलावाचा शुभारंभ आज उत्साहात झाला. लिलावासाठी आलेल्या ११ शेतकऱ्यांच्या ११ क्रेट टोमॅटोला प्रत्येकी १ हजार ८०१ रुपये असा भाव मिळाला. सप्तशृंगी व्हेजीटेबल कंपनीचे बबन गाडे यांनी हा सर्वाधिक भाव देत ११ क्रेटची खरेदी केली. मिळालेल्या बाजारभावाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ------------- वणी-सापुतारा रस्त्यालगत असलेल्या बाजार समितीच्या उपबाजार आवारात लिलावाप्रसंगी सभापती प्रशांत कड यांनी टोमॅटो उत्पादकांनी शेतीमालाची योग्य प्रतवारी करून बाजारात आणण्याचे आवाहन केले. मोठा (सुपर/एक नंबर), मध्यम, लहान (गोल्टी) तसेच बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला) अशी प्रतवारी करून २० किलोच्या क्रेटमध्ये माल विक्रीस आणल्यास शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. उपसभापती दत्तू भेरे यांनी व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले. मालाची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्तेनुसार योग्य भाव देण्याची भूमिका व्यापारी वर्गाने ठेवावी, असे त्यांनी सांगितले. प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब घडवजे व राजेंद्र महाले यांनी अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ---------- वणी उपबाजारात परिसरातील दुधखेड, पारेगाव, मुळाणे, भातोडे, चंडीकापूर, अहिवंतवाडी, जिरवाडे, कोल्हेर पिंप्री, अंचला, माळे, पांडाणे, अंबानेर, सागपाडा, कोशिंबे, हस्ते, चौसाळे, पिंगळवाडी, करंजखेड आदी भागांतील शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी येत आहेत. श्रीधर महाले, कारभारी कड, सुनील बर्डे, संचालक गंगाधर निखाडे, दत्तू राऊत, शामराव बोडके, पांडुरंग गडकरी, योगेश बर्डे, नंदू चोपडा, सचिव जे. के. जाधव, किरण जगताप, दौलत जाधव आदी उपस्थित होते. तसेच आडतदार कृष्णा गायकवाड, विक्रम बोडके, संतोष बोडके, पिंटू साखला, तुषार साखला, प्रवीण सोनवणे, गणेश उंबरे, निलेश गाडे, काळू आहेर, शाम खोडे, केशव चित्ते, विकास घुगे, सागर घुगे, सुनील जाधव, विकास उंबरे, बबन गाडे, पप्पू कदम, केदू गांगुर्डे आदींनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. उपबाजार आवाराचे सचिव मुक्तार शाह यांनी प्रास्ताविक केले. मुख्य सचिव जे. के. नाठे यांनी आभार मानले. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT