नाशिक

संजीवनीच्या तीस विद्यार्थ्यांना विसेन इन्फोटेकमध्ये आकर्षक पॅकेजवर नोकरी

CD
YEO26B25292 कोपरगाव : विसेन इन्फोटेक कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व इतर. ------------------- संजीवनीच्या तीस विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेज विसेन इन्फोटेकमध्ये संधी ः शिकत असतानाच नोकरीमुळे पालक समाधानी ------------ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१४ : कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकाचवेळी तीस विद्यार्थ्यांना विसेन इन्फोटेक या बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरीची संधी दिली. या सर्वांना कंपनीने आकर्षक पॅकेज दिले. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट मॉडेलमुळे शेकडो विद्यार्थी शिकवत असतानाच नोकरीला लागून कमावते होत आहे. विसेन इन्फोटेक ही जागतिक पातळीवर आयटी सेवा व सॉफ्टवेअर सोल्युशन क्षेत्रातील नामांकित आहे. ट्रेनिग अँड प्लेसमेंट विभागाने विकसित केलेल्या प्लेसमेंट मॉडेलमुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नामांकित कंपन्यात नोकरीची संधी मिळते आहे. यामुळे संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश म्हणजे हमखास चांगल्या पगाराची नोकरी हे समिकरण दृढ झाले आहे. नामांकित कंपन्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध असल्याने स्वाभाविकपणे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने आणि मोठ्या संख्येने नोकरीची संधी मिळते. या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या हर्ष बढे, रोहित बारगळ, निकित भोगे, हिमांशू छाजेड, ईश्वरी देशमुख, दीपक काळे, कल्याणी कर्डे, अक्षय पेटकर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या श्रेयश भागवत, निकिता भोर, सर्वेश्वर भुजाडे, प्रतीक बुलकुंडे, महेश दहे, भक्ती इमले, वैष्णवी जगताप, संज्योत काकडे, श्रेयश घोडके, शुभम कासार, यश खेडकर, स्वरूप मगर, पूणम मंडलिक, ऋतुजा राजपुत, तेजस्विनी फासले, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कुणाल देहरकर, धनश्री गाडे, प्रज्ञा जगताप, भूमी नरोडे, ओम लोखंडे, मुस्तीफा कुरेशी व अनेरी ठाणगे यांची नोकरीसाठी निवड केली. संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले आहे. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची सर्व टीम, विभाग प्रमुख उपस्थित होते. ----------- मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. विसेन इन्फोटेक ही आयटी व सॉफ्टवेअर कंपनी आहे. मला माझ्या अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट आयओटी बेस्ड सॉफ्टवेअर फॉर लायब्ररी युझेसची या निवडीसाठी मोठी मदत झाली. संजीवनी शैक्षणिक संकुलाने माझ्यात विविध गुणांची पेरणी केली, ती थेट माझ्या करिअरला गवसणी घालण्यासाठी उपयोगी पडली. - स्वरूप मगर, विद्यार्थी --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT