नाशिक

येवल्यात प्रदोष निमित्त महामृत्युंजय व ऋणमुक्तेश्वर मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी

CD
YEO26B25302 येवला : ऋणमुक्तेश्वर व महामृत्युंजय मंदिरात महादेवाच्या पिंडीला प्रदोष पर्वानिमित्त करण्यात आलेला शृंगार. -------------- प्रदोषानिमित्त शिवभक्तांची मांदियाळी -------------- येवला ः महामृत्युंजय व ऋणमुक्तेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी -------------- ​सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१५ : शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय व ऋणमुक्तेश्वर मंदिरात प्रदोष पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पहाटेपासूनच शिवभक्तांच्या रांगांनी मंदिर परिसर फुलून गेला. सायंकाळी महादेवाच्या पिंडीवर दूध, दही, तूप, मध आणि पंचामृताचा विधिवत महाअभिषेक करण्यात आला. हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिर परिसरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती दिनानिमित्त भव्य रांगोळी काढण्यात आली होती. शंभूराजे जयंतीचे औचित्य साधून नंदीभोवती केलेली ही कलात्मक सजावट आणि रांगोळी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. शिवभक्तांनी यावेळी शंभूराजांना अभिवादन करत जयंतीचा उत्साह द्विगुणित केला. ​मंदिर समिती आणि स्थानिक शिवभक्तांच्या नियोजनामुळे हा संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला. श्रद्धेचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा एक आगळावेगळा संगम या निमित्ताने येवलेकरांना अनुभवता आला. येथील ऐतिहासिक व जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सोहळ्याचे मुख्य आकर्षण महादेवाला करण्यात आलेला श्री शनी भगवान रूपातील देखणा शृंगार करण्यात आला होता. ​सायंकाळी प्रदोष काळाच्या मुहूर्तावर भगवान शिवशंकराचा जलाभिषेक व महापूजा करण्यात आली. शृंगार पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ​पूजेनंतर शास्त्रोक्त पद्धतीने भस्म आरती करण्यात आली. धुपारती आणि भस्माच्या उधळणीने वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता निर्माण झाली होती. शनी देवाच्या रूपातील हा दुर्मिळ शृंगार डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT