नाशिक

गुणवंत गुरुजीची स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुख पदाला दिमाखात गवसणी..! जिल्ह्यात १२२ शिक्षकांची केंद्रप्रमुखपदी पदस्थापना,शैक्षणिक व्यवस्थापन बळकट होण्याची अपेक्षा

CD
पान-३ मेन गुणवंत गुरुजींची स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुख पदाला गवसणी जिल्ह्यात १२२ शिक्षकांची केंद्रप्रमुखपदी पदस्थापना संतोष विंचू ः सकळ वृत्तसेवा येवला, ता. २३ : कर्तृत्व, गुणवत्ता आणि आत्मविश्वासाची साथ असेल, तर कोणतेही वय अडथळा ठरत नाही. याचा जिवंत पुरावा जिल्ह्यातील १२२ गुरुजींनी घालून दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देताना स्वतःही अभ्यासाची ज्योत तेवत ठेवत त्यांनी स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुख पदावर दिमाखात गवसणी घातली. या सर्व गुणवंत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया मंगळवारी (ता. २३) जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण होत त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा मिळाला आहे. विभागीय स्पर्धेच्या रणांगणात गुणवत्ता सिद्ध करत जिल्हा परिषदेत तब्बल १२२ शिक्षकांची केंद्रप्रमुख पदावर तात्पुरती पदस्थापना होत शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत १२२ प्राथमिक व पदवीधर शिक्षकांची समूहसाधन केंद्रसमन्वयक (केंद्रप्रमुख) पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना केली आहे. ही निवड जिल्हा परिषदेच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ मधील गुणवत्ता यादीनुसार झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मंजुरीने हे आदेश जारी करण्यात आले. या निवडीद्वारे पदस्थापना मिळालेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोग संरचनेनुसार सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील एस-१५ ही वेतनश्रेणी तसेच केंद्रप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एक अतिरिक्त वेतनवाढ देऊन त्यांची वेतन निश्चिती केली जाईल. याची निवड न्यायलयीन प्रकियेपर्यत पोहोचली आहे. यामुळे सदर पदोन्नती व पदस्थापना ही पूर्णपणे तात्पुरती असून अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहूनच हे आदेश खुल्या प्रवर्गातील रिक्त (बिंदू विरहित) पदांवर देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संनियंत्रण अधिक मजबूत होईल. परीक्षा अन् पदोन्नतीतून नियुक्ती जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या २४४ जागा आहेत. यातून १२२ जागा परीक्षेतून, तर १२२ जागा पदोन्नतीतून (प्रमोशन) भरल्या जाणार होत्या. आज थेट परीक्षेतून पूर्ण १२२ जण नियुक्त झाले आहेत. तर पदोन्नतीतूनही शिक्षकांच्या केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती प्रकिया सुरू आहे. दृष्टिक्षेप...! - केंद्रप्रमुख परीक्षेसह टीईटी, सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती. - संबंधित शिक्षकांना सात दिवसांच्या आत नियुक्त केलेल्या समूहसाधन केंद्रावर हजर होणे बंधनकारक. - सध्या जनगणना किंवा मतदार यादी पुनरीक्षणाचे काम असेल तर नियुक्तीनंतरही ते करणे बंधनकारक. - मालेगाव, बागलाण, निफाड आणि सुरगाणा तालुक्यांत शैक्षणिक संनियंत्रण मजबूत करण्यासाठी सर्वाधिक नियुक्ती. - देवळा तालुक्यात सर्वात कमी केंद्रप्रमुखांची नियुक्ती. - दिव्यांग शिक्षक नियुक्ती : यातून पाच शिक्षक दिव्यांग ज्येष्ठता प्रवर्गातून. तालुकानिहाय केंद्रप्रमुख नियुक्ती -मालेगाव - १० -बागलाण - १० -निफाड - १० -सुरगाणा - १० -दिंडोरी - ९ -इगतपुरी - ९ -येवला - ९ -कळवण - ९ -सिन्नर - ८ -चांदवड - ८ -त्र्यंबकेश्वर - ७ -पेठ - ७ -नांदगाव - ७ -नाशिक - ५ -देवळा - ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : महाबळेश्वरमध्ये १५७ मिलीमीटर पावसाची नोंद

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT