नाशिक

शाळा-महाविद्यालयांतून संविधानाचे शिक्षण देणे गरजेचे

CD
अँकर -- फोटो ः 25724 अंगणगाव : हक्क समन्वय समितीच्या जिल्हा बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. चारुदत्त अहिरे. व्यासपीठावर अर्जुन कोकाटे व पदाधिकारी. --- शाळा-महाविद्यालयांतून संविधानाचे शिक्षण देणे गरजेचे डॉ. अहिरे : ‘समता’मध्ये संविधान हक्क समन्वय समितीची जिल्हा बैठक सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २४ : भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि विविध तरतुदींचे शिक्षण शाळा व महाविद्यालयांमधून दिल्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना पोहोचणार नाही, असे प्रतिपादन संविधान चळवळीतील डॉ. चारुदत्त अहिरे यांनी केले. -- येथील समता प्रतिष्ठान संस्थेच्या अंगणगाव येथील डॉ. जगन्नाथ वाणी सभागृहात सुजाण नागरिक मंचांतर्गत ‘संविधान हक्क समन्वय समिती’ची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. अहिरे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. अहिरे म्हणाले की, संविधानातील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये समता रुजवण्यासाठी अभ्यासक्रमातच संविधानाला प्राधान्य मिळायला हवे. संविधानाच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय अधिकारांची जाणीव होईल, तसेच कर्तव्यांचीही प्रेरणा मिळेल. याप्रसंगी सुजाण नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष शिवदास म्हसदे, प्रा. अर्जुन कोकाटे व अजहर शहा यांचीही भाषणे झाली. यावेळी राजकुमार सावंत, सुभाष लोकरे, मिलिंद तेलुरे, रामभाऊ केदारे, आप्पासाहेब शिंदे, निखिल संसारे, हेमंत पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. -- येवला तालुका कार्यकारिणी घोषित या बैठकीत संविधान समन्वय समितीच्या येवला तालुका कमिटीची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते अजहर शहा, तर कार्याध्यक्षपदी दिनकर दाने यांची निवड करण्यात आली. याशिवाय कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. समीर देशमुख, सामाजिक संस्था संवाद प्रमुख म्हणून जमील अन्सारी, मुख्य विभाग संघटक म्हणून प्रवीण खळे, खजिनदार म्हणून रामनाथ पाटील आणि तालुका सचिवपदी बाबासाहेब कोकाटे यांची निवड झाली. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT