Mumbai local train delay at Mulund station today due to train fire
Mumbai local train disruption latest update : मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात बांधकामाचे साहित्य थेट रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्याने आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून आले. ओव्हरहेड वायरला साहित्याचा स्पर्श झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून स्लो मार्गावरील लोकल गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने आणि ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला.