नाशिक

येवल्यात तासाभर मुसळधार पाऊस

CD
येवल्यात तासाभर मुसळधार पाऊस वातावरणात गारवा, खरिपाच्या कामांना गती सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २४ : येवला शहर व परिसरात बुधवारी (ता. २४) सायंकाळच्या सुमारास झालेल्या तासभर जोरदार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उकाडा कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, खरीप हंगामाच्या पेरणीसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. -- सकाळपासूनच परिसरात रिमझिम सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन पावसाचे ढग जमा झाले होते. दुपारनंतर सुमारे तीन वाजेच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि पाच ते दहा मिनिटे जोरदार वादळ झाले. त्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण करत अवघ्या वीस मिनिटांत मुसळधार सुरुवात केली. पुढे तास ते दीड तास कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम राहिला. या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते, तर ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साठून जमीन चांगल्या प्रकारे ओलसर झाली आहे. यापूर्वी तालुक्यात केवळ १७ मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र, दमदार पावसामुळे जमिनीला आवश्यक ओलावा मिळाल्याने रखडलेल्या पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा बळावल्या असून खरीप हंगामाची सुरुवात उत्साहवर्धक होण्याची चिन्हे आहेत. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT