नाशिक

वादग्रस्त जागेवर घरकुल बांधकामामुळे सायगाव येथील कुटुंबाचे उपोषण न्यायालयीन दावा प्रलंबित असताना परवानगी दिल्याचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

CD
वादग्रस्त घरकुल प्रकरणी कुटुंबासह आमरण उपोषण सायगाव येथील लाभार्थी मंजुरीत अनियमिततेचा आरोप; चौकशी व कारवाईची मागणी सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २४ : सायगाव (ता. येवला) येथील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर घरकुल प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत सुधाकर पठारे यांनी कुटुंबासह पंचायत समिती कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. न्यायालयीन वाद प्रलंबित असलेल्या जागेवर घरकुल बांधकामास परवानगी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबत सक्षम दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित असून ग्रामपंचायतीकडे हरकत अर्जही दाखल करण्यात आला होता. या सर्व बाबींची माहिती असतानाही लाभार्थ्यास बांधकामास परवानगी देण्यात आली. तसेच अपात्र लाभार्थ्याकडून शासनाची रक्कम परत घेण्याबाबत ग्रामपंचायतीने लेखी पत्र दिले असून लाभार्थ्याने ती रक्कम जमा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सुरुवातीलाच मंजुरी कशी देण्यात आली आणि संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कोणती कारवाई झाली, याबाबत प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोप पठारे यांनी केला. वादग्रस्त जागेवरील बांधकाम तातडीने थांबविणे, मंजुरी प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करणे, दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर विभागीय तसेच फौजदारी कारवाई करणे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. YEO26B25729 येवला : घरकुलात अन्याय झाल्याने येथील पंचायत समिती समोर उपोषणाला बसलेले सायगाव येथील सुधाकर पठारे व कुटुंब.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामन्याची वेळ बदलली; नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार? कारण काय तर

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

SCROLL FOR NEXT