नाशिक

मकाच्या खळ्यावर साडेचार फुटी इंडियन कोब्राचे रेस्क्यू येवल्यात सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

CD
YEO26B25732 येवला : मकाच्या खळ्यावर पकडलेला नाग. --------------- २०-१ मक्याच्या खळ्यावर साडेचार फुटी कोब्रा --------- सर्पमित्र सोनवणेंच्या प्रयत्नांना यश --------- ​येवला : येथील हरिभाऊ ठाकूर यांच्या मकाच्या खळ्यावर साडेचार फूट लांबीचा अत्यंत विषारी इंडियन कोब्रा'' (नाग) जातीचा सर्प आढळून आल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. येथील सर्प मित्र दीपक सोनवणे यांनी हा कोब्रा शर्तीच्या प्रयत्नांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देत यशस्वी रेस्क्यू केला. खळ्यावर मका काढण्याचे व आवराआवरीचे काम सुरू असताना अचानक या मोठ्या नागाचे दर्शन झाले. नाग समोर येताच कामगारांची धावपळ उडाली. हरिभाऊ ठाकूर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ प्रसंगावधान राखून स्थानिक सर्पमित्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधला.​घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र सोनवणेंनी कसलाही विलंब न करता मक्याच्या खळ्यावर धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि शांततेने, नागाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. साडेचार फुटी जहाल विषारी कोब्रा नाग जेरबंद झाल्याने ठाकूर परिवार आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. सोनवणेंनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि धाडसाबद्दल ठाकूर परिवारासह ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT