नाशिक

घराची भिंत कोसळून आडगाव चोथवा येथे वृद्ध महिला जखमी! येवला तालुक्यात पावसाची हजेरी पण दमदार पावसाची प्रतीक्षाच!

CD
पान एक मेन -------------------- २५७५४ येवला : आडगाव चोथवा येथे पावसाने कोसळलेली भिंत. घराची भिंत कोसळून आडगाव चोथवा येथे महिला जखमी येवला तालुक्यात पावसाची हजेरी; दमदार पावसाची प्रतीक्षाच सकाळ वृत्तसेवा येवला,ता.२६ : शहरात शुक्रवारी सायंकाळी अर्धा तासाच्या कालावधीत शहर व तालुक्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. जोरदार असलेला पाऊस अल्पकाळ टिकला यामुळे तालुकावाशीयांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा लागूनच आहे. दरम्यान, घराची भिंत कोसळून आडगाव चोथवा येथे एक ज्येष्ठ महिला जखमी झाली असून येवला येथे उपचार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी (ता.२५) दिवसभर उघडीप दिली. त्यानंतर शुक्रवार (ता.२६) सकाळपासूनच वातावरणात उकाडा होता, अपेक्षेप्रमाणे सायंकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र काही मिनिटे कोसळल्यानंतर पाऊस थांबला तालुक्याच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यातील घाटमाथ्यावरील रहाडी, खरवंडी, देवदरी, ममदापूर, कोळगाव, वाईबोथी, रेंडाळे, अंगुलगाव, वाघाळे आणि कोळम या गावांमध्ये पावसाने दमदार सलामी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून खरीप पेरण्यांना वेग येण्याची आशा निर्माण झाली आहे. दुसरीकडे, येवला शहराच्या पूर्वेकडील कोटमगाव खुर्द, कोटमगाव बुद्रुक, नागडे, मातुलठाण, आडगाव, नांदेसर आणि पिंपळगाव जलाल परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने जमिनीची ढेकळे फुटली आहेत. मात्र, अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, तांदळवाडी, कासारखेडे, बाळापूर, खैरगव्हाण, विसापूर, कातरणी, पाटोदा, ठाणगाव, विखरणी, सावरगाव, अनकुटे, गुजरखेडे, कानडी, गोपाळवाडी, देवरगाव, सावखेडे आदी गावांमध्ये अद्याप समाधानकारख्या पावसास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पेरण्या खोळंबल्या आहेत.तालुक्यात पावसाचे चित्र अत्यंत विषम असून, काही भागांत समाधानकारखा पाऊस झाला असला तरी अनेक गावे अजूनही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ------------------ पावसाने कोसळली भिंत तालुक्यातील आडगाव चोथवा भागात झालेल्या जोरदार पावसामुळे एका घराची भिंत कोसळून वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.जीर्ण झालेली भिंत असल्याने ती कोसळल्याचे सांगण्यात येते.रेशमबाई खोकले असे जखमी महिलेचे नाव असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

Takli Rajerai vet hospital crisis: टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; नऊ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dangerous ZP School Building: टाकळी राजेराय जि.प. शाळेची धोकादायक इमारत; २०१७ पासून लोबकळता स्लॅब, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ

SCROLL FOR NEXT