पान-२ मेन
YEO26B26523
येवला : शिवसेनेच्या संघटनात्मक आढावा बैठकीत बोलताना उपनेते रवींद्र मिर्लेकर. व्यासपीठावर पदाधिकारी.
--------------
शिवसेना फुटिरांना जागा दाखविणार
रवींद्र मिर्लेकर : येवल्यात संघटनात्मक आढावा, पुन्हा भरारी घेण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.३१ : शिवसेना गद्दारांना त्यांची जागा दाखवून पुन्हा एकदा भरारी घेईल. सच्चेपणा शिवसैनिकांच्या रक्तात असल्याने पक्षाशी व उद्धव ठाकरेंवर बेईमान झालेल्या लालचींना शिवसैनिक गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
--------------
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर जयंत दिंडे, राजू पाटील, जिल्हा प्रमुख प्रवीण नाईक, सतीश कदम, वाल्मीक गोरे आदी उपस्थित होते. ‘शिवसेना संघटन बांधणी करणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे काम असून मुख्यमंत्री असताना कोविडचा महाभयंकर काळ असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र होरपळून दिला नाही. एक यशस्वी व जनताभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. हाच आदर्श घेऊन आपण जनमानसात जा, उद्याचा दिवस आपला असेल असा आशावाद मिर्लेकर यांनी चेतविला.
लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी पक्ष सोडून जाणारे आपल्याच पाठीत खंजीर खुपसून आपली राजकीय गच्छंती करतात त्यामुळे शिवसैनिकांनी यापुढे काळाची पाऊल ओळखून खऱ्या खोट्यांची ओळख करून मार्गक्रमण केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
राजू पाटील, सतीष कदम, भास्कर कोंढरे, छगन आहेर, सर्जेराव सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले. युवासेना तालुकाध्यक्ष संतोष गोरे, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती जाधव, कैलास घोरपडे, जनार्दन भवर, गणेश वडनेरे, दीपक भदाणे, अमित अनकाईकर, रावसाहेब नागरे, विठ्ठल पिंपळे, विठ्ठल महाले, भरत बोंबले, रमेश फरताळे, अशोक गरूड, भागिनाथ थोरात, श्याम व्यापारे, अनंता आहेर, गणेश पेंढारी, राजेंद्र सानप, ज्ञानेश्वर शिर्के, पंकज नळे, संतोष साताळकर, साहेबराव बनकर, संजय सालमुठे, श्रीपाल मंडलेचा, सतीश बांगर, भावराव कुदळ, बंटी सोनवणे, विशाल पवार, खंडू साताळकर, कन्हैया कातारी आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भास्कर कोंढरे यांनी प्रास्ताविक तर नितीन संसारे यांनी सूत्रसंचालन केले. छगन आहेर यांनी आभार मानले.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.