मंदिराच्या जागेवरून दोन गटात हाणामारी
नगरसूल ः दोन्ही गटातील ३० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३१ : नगरसूल (ता. येवला) येथे मंदिराच्या बांधकामाची जागा मोजत असताना तसेच राजकीय हेव्या दाव्यातून दोन गटात येथे तुफान हाणामारी झाली. या दोन्ही गटातून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून ३५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर दोन जणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक निकम यांनी सुमारे २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून नर्मदा माता मंदिरात दर्शनासाठी गेलो असता जुना राजकीय वाद उकरून काढत या सर्वांनी मला व भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांना मारहाण केली. लाकडी दांडे, फायटर, तलवारीने मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूने अंकुश घोडेस्वार यांनी देखील २० हून अधिक जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये विठ्ठल रुक्मिणी व संत सावता महाराज मंदिराच्या जागेची आखणी करत असताना निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली तसेच जातिवाचक शिवीगाळ केली. लोखंडी रॉड, चॉपरने मारहाण करून आपल्या साथीदारांनाही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी माणगावकर, तालुका पोलिस निरीक्षक संदीप बोरसे, उपनिरीक्षक ठोंबरे, श्री. माळोदे आदी तपास करत आहेत.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.