नाशिक

उंदीरवाडीला कौटुंबिक वादातून माय-लेकीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

CD
पान-१ -------------- उंदीरवाडीत माय-लेकीवर कुऱ्हाडीने हल्ला कौटुंबिक वादातून घटना ः दोघींवर उपचार, संशयितांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१ : उंदीरवाडी शिवारात एका शेतात कौटुंबिक वादातून माय-लेकीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संगीता राजेंद्र दौंडे आणि त्यांची मुलगी जयश्री राजेंद्र दौंडे या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी राजेंद्र दौंडे (अंदरसूल) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र दौंडे हे आपल्या कुटुंबासह अंदरसूल शिवारातील गट नं. १४६/२ मधील शेतात राहतात.आरोपी प्रवीण उर्फ सोन्या अशोक जाधव हा त्यांचा शेजारी असून, तो नेहमी वेगवेगळ्या कारणांवरून दौंडे कुटुंबाशी वाद घालतो.यापूर्वी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असून तो जामिनावर बाहेर आहे. सोमवारी सायंकाळी राजेंद्र दौंडे हे शेतातील विहिरीवरील पाण्याचे मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी संगीता आणि मोठी मुलगी जयश्री या शेतात गवत काढणीचे काम करत होत्या. त्याच वेळी आरोपी प्रवीण याने जुन्या भांडणाची कुरापत काढून माय-लेकींना जातिवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.तुम्हांला आमच्या शेजारी राहण्याचा काही अधिकार नाही असे म्हणत त्याने हातातील धारदार कुऱ्हाडीने जयश्रीच्या डोक्यावर आणि हातावर वार केले.तसेच, तिची आई संगीता हिच्याही डोक्यावर कुऱ्हाडीने गंभीर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. हल्ला झाल्यावर महिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून राजेंद्र दौंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली, ज्यानंतर आरोपी प्रवीण तिथून पळून गेला.जखमी माय-लेकींना तातडीने उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी संशयित आरोपी प्रवीण उर्फ सोन्या अशोक जाधव याच्याविरुद्ध पोस्को आणि अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक संदीप बोरसे व सहकारी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Astrology: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Gas Cylinder : घरगुती वापराचा सिलिंडर, खाऊगल्लीत ‘सरेंडर’; शहरातील वाढत्या प्रकारांकडे भरारी पथकांचा काणाडोळा

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Manoj Jarange Patil : उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून... आंतरवालीत 3 क्विंटल दाळबाटी!

SCROLL FOR NEXT