नाशिक

येवला नगरपालिकेकडुन माझी वसुंधरा अभियानअंतर्गत वृक्षारोपण मोहीम

CD
YEO26B26547 येवला : नगरपरिषदेमार्फत वृक्षारोपण करताना आमदार पंकज भुजबळ व विविध पदाधिकारी- अधिकारी. ------------ ३०-२ येवला नगरपालिकेकडून माझी वसुंधरांतर्गत मोहीम ------------ नवजीवन कॉलनीत शंभर वृक्षांची लागवड --------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१ : पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे आणि शहरातील मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेमार्फत ‘माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत. येथील नवजीवन कॉलनीतील मोकळ्या जागेत वृक्षारोपण मोहीम पार पडली. आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नवजीवन कॉलनीतील मोकळ्या जागेत विविध प्रकारच्या १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. शहरातील मोकळ्या जागांचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास करून त्याठिकाणी हिरवाई निर्माण करण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते दीपक लोणारी, स्वच्छता सभापती पारुल गुजराती, नगरसेवक प्रशांत शिंदे, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, समर्थ अलगट, वसंत पवार, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, पवन आढाव, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, प्रकल्पाधिकारी संदीप बोढरे, विशाल लोणारी, लखन बाकळे, प्रभाकर वाघ, सुमीत बागल, शांताराम बागल आदी उपस्थित होते. दरम्यान मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी शहरातील उपलब्ध प्रत्येक मोकळ्या जागेत टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सांगितले. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Janmashtami Bank Holiday: जन्माष्टमीनिमित्त 4 सप्टेंबरला बँका बंद की सुरू? UPI सेवेवर देखील परिणाम? पाहा RBI ची अपडेट

ISRO GSLV-F17 Launch: चक्रीवादळे, पूर अन् वणव्यांवर राहणार नजर; EOS-05 उपग्रहाचे आज मध्यरात्री होणार उड्डाण!

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT